जामखेड टाइम्स वृत्तसेवा | २६ जुलै २०२५ : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे संकट निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. आज भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत काही भागांमध्ये २०४ मिमी पेक्षा अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (havaman andaj 2025)

🛑 रेड अलर्ट जिल्हे:
- पालघर, पुणे घाट परिसर
- चंद्रपूर, गोंदिया (विदर्भ)
या भागांत अति मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, वादळी वारे यांचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील नागरिकांनी घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🟠 ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे:
- मुंबई, ठाणे, कोकण विभाग
- नाशिक, सातारा घाट
- जळगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी
- नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, अमरावती
- जालना, हिंगोली, नांदेड
या भागांमध्ये ११५ मिमी ते २०४ मिमी दरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज असून ४०-५० किमी/ताशी वेगाने वारे आणि विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे.
🌩️ विदर्भात पावसाची स्थिती:
विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला असून चंद्रपूर आणि गोंदिया येथे अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली आणि अमरावती या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. तर पश्चिम विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आलाय. आज विदर्भात ताशी ४० ते ५० किमी वेगाने सोसायट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
🌊 समुद्रात मोठी भरती – कोकणात सावधानतेचा इशारा
२६ जुलै रोजी दुपारी १.२० वाजता कोकण किनारपट्टीवर (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) सुमारे ४.६७ मीटर उंच लाटांची भरती येणार आहे. या काळात समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
⚠️ नागरिकांसाठी खबरदारीचे उपाय:
- पूरग्रस्त भागात प्रवास टाळा
- छत्री किंवा रेनकोटचा वापर करा
- पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहा
- भरतीच्या वेळी समुद्र किनारी जाणे टाळा
- प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा