जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेडमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा थरार सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वीची अपघाताची भीषण घटना ताजी असतानाच, आज (३ रोजी) पुन्हा एकदा कर्जत रोडवर भीषण अपघातात झाला आहे. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.(jamkhed accident news)

“जामखेड शहराजवळील अहिल्यावस्ती येथे ऊसाचा ट्रॅक्टर आणि मोटारसायकल यांच्यात आज सायंकाळी भीषण अपघात झाला. या घटनेत पिंपरखेडचे भाऊसाहेब लबडे आणि कवडगावचे जालिंदर सांगळे हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात दोघांचेही पाय मोडले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (jamkhed accident news today)
रात्रीच्या अंधारात मोटारसायकलला ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला.दोनच दिवसांपूर्वी अश्याच एका भीषण अपघातात धानोरा येथील एका तरुणाने आपला जीव गमावला आहे. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा ऊसाचा ट्रॅक्टर व मोटारसायकलचा भीषण अपघात झाला.
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बेजबाबदारपणामुळे सामान्य जनतेचा बळी जातोय का? असा सवाल आता उपस्थित होतोय. प्रशासनाने आता तरी कठोर कारवाई करावी, अशी मागणी जामखेडकरांमधून जोर धरत आहे.