Samruddhi Mahamarg Smart City List : समृध्दी महामार्गालगत राज्य सरकार उभारणार 16 स्मार्ट सिटी प्रकल्प, नगर जिल्ह्यातील दोन ठिकाणांचा समावेश, जाणून घ्या स्मार्ट सिटी प्रकल्पांची यादी व फायदे !
Samruddhi Mahamarg Smart City List : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट (CM devendra fadnvis dream Project) असलेल्या समृध्दी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्णत्वास आले आहे. लवकरच हा टप्पा पूर्ण होणार आहे. समृद्धी महामार्ग बनवताना या महामार्गालगत १६ ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्प (samruddhi mahamarg smart city) उभारण्याचा अराखडा तत्कालीन युती सरकारने तयार केला होता. आता त्याच प्लॅनची अंमलबजावणी करण्याच्या हालचालींना मोठा वेग आला आहे. येत्या सोमवारी (३० डिसेंबर रोजी) मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. सरकारच्या पहिल्या शंभर दिवसात प्राधान्याने करावयाच्या कामांमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत समृद्धी महामर्गालगत 16 स्मार्ट सीटी बनविण्याचे नियोजन आहे. त्यातील दोन ठिकाणी स्मार्ट सिटीच्या कामांना वेग आला आहे. यामध्ये नागपूर जवळील वर्धा जिल्ह्यातील विरूल तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळ माळ सावरगाव येथील स्मार्ट सिटीच्या कामांचा समावेश आहे. स्मार्ट सीटी प्रकल्पांतर्गत या दोन्ही शहरात कृषी क्षेत्राशी निगडित उद्योग उभारले जाणार आहे.
समृध्दी महामार्ग स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे ‘कोणते’ फायदे होणार?
– स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कृषी संबंधित उद्योग व्यवसाय निर्माण केले जातील. याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होईल. यामुळे स्मार्ट सिटी परिसरात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल.
– कृषी, वाणिज्य, आयात-निर्यात व्यवसायाचे संबंधित उद्योगमुळे या भागातील शेतकऱ्यांना लाभ होईल. तसेच या क्षेत्राशी निगडित लघुउद्योगांना देखील चालना मिळेल.
– महामार्गावर स्मार्ट सिटी असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल निर्यात करायसाठी जेएनपीटी, वाढवन अशा बंदरांना कनेक्टिव्हिटी मिळेल. त्यादृष्टीने सरकारने समृद्धीची निगडित स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या उभारणीला गती दिली आहे. त्याअनुषंघाने येत्या 30 तारखेला मुंबईत उच्चस्तरीय बैठक होत आहे.
Samruddhi Mahamarg Smart City List : समृध्दी महामार्ग स्मार्ट सिटी यादी
• लेणाड (चेनेज – 673) ठाणे.
• सपगाव (चेनेज – 670 ) ठाणे.
• फुगाले (चेनेज – 635) ठाणे.
• सावळी विहीर (चेनेज – 520) नगर.
• धोत्रा (चेनेज 505) कोपरगाव नगर.
• जांबरगाव (चेनेज – 488.5) संभाजीनगर.
• हडस पिंपळगाव ( चेनेज -470)
• जामवाडी ( चेनेज – 365) जालना.
• माळ सावरगाव ( चेनेज – 340) बुलढाणा
• साब्रा ( चेनेज – 283.3) मेहकर बुलढाणा
• रिधोरा ( चेनेज – 239.6 ) वाशिम.
• वानोज ( चेनेज – 210.5 ) वाशिम.
• शेह ( चेनेज – 182.5 ) कारंजा वाशिम.
• शिवनी ( चेनेज – 137.5) अमरावती.
• दत्तपुर ( चेनेज – 105.7) अमरावती.
• विरुल (चेनेज – 80 ) वर्धा.
Proposed List of Krushi Samruddhi Nagar
DISTRICT : VARDHA
TALUKA : ARVI
NEW TOWN : VIRUL
CHAINAGE : 80KM
DISTRICT : AMRAVATI
TALUKA : DHAMANGAON RAILWAY
NEW TOWN : DATTAPUR
CHAINAGE : 105.7KM
DISTRICT : AMRAVATI
TALUKA : NANDGN KH.
NEW TOWN : SHIVNIL
CHAINAGE : 137.5KM
DISTRICT : WASHIM
TALUKA : ARVI
NEW TOWN : SHEH
CHAINAGE : 182.1KM
DISTRICT : WASHIM
TALUKA : KARANJA
NEW TOWN : VANOZA
CHAINAGE : 210.5KM
DISTRICT : WASHIM
TALUKA : MALEGAON
NEW TOWN : RIDHORA
CHAINAGE : 239.6KM
DISTRICT : BULDHANA
TALUKA : MEHKAR
NEW TOWN : SABRA KABRA
CHAINAGE : 283.3KM
DISTRICT : BULDHANA
TALUKA : SINDKHED RAJA
NEW TOWN : SAVARGAON MAL
CHAINAGE : 340KM
DISTRICT : JALNA
TALUKA : JALNA
NEW TOWN : JAMWADI
CHAINAGE : 365KM
DISTRICT : AURANGABAD (Sambhaji Nagar)
TALUKA : VAIJAPUR
NEW TOWN : HADAS PIMPALGAON
CHAINAGE : 470KM
DISTRICT : AURANGABAD (Sambhajinagar)
TALUKA : VAIJAPUR
NEW TOWN : GHAYGAON/JAMBHARGAON
CHAINAGE : 488.5KM
DISTRICT : NAGAR
TALUKA : KOPARGAON
NEW TOWN : DHOTRA
CHAINAGE : 505KM
DISTRICT : NAGAR
TALUKA : KOPARGAON
NEW TOWN : SAVALI VIHIR
CHAINAGE : 520.698KM
DISTRICT : THANE
TALUKA : SHAHAPUR
NEW TOWN : FUGALE
CHAINAGE : 635KM
DISTRICT : THANE
TALUKA : SHAHAPUR
NEW TOWN : SAPGAON
CHAINAGE : 670KM
DISTRICT : THANE
TALUKA : SHAHAPUR
NEW TOWN : HIVRAS/LENAD
CHAINAGE : 673KM
DISTRICT : THANE
TALUKA : BHIVANDI
NEW TOWN : CHINCHWALI
CHAINAGE : 685KM