रेशनकार्ड संबंधित अपडेट मोबाईलवर मिळवण्यासाठी अशी करा online नोंदणी, जाणून घ्या सविस्तर https://nfso.gov.in/State/MH
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । रेशनकार्डशी संबंधित महत्त्वाच्या अपडेट्स आता एसएमएसद्वारेही मिळणार आहेत. ग्राहकसेवेत सुलभता आणण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. संबंधित ग्राहकांचा मोबाईल क्रमांक रेशनकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. (Ration card related updates will be available on mobile, so register online)
‘वन नेशन, वन रेशन’ मोहिमेंतर्गत अन्न पुरवठा प्रक्रिया अधिकाधिक सुलभ आणि ग्राहककेंद्री करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी संकेतस्थळ आणि मेरा रेशनकार्ड ॲपची ( mera restioncard app) निर्मिती करण्यात आली आहे.
मात्र, ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्राहकांना नेटवर्क अभावी व शहरी भागातील काही ग्राहकांना इंटरनेट हाताळता येत नसल्याने ऑनलाइन माहिती मिळवणे त्रासदायक ठरत आहे. ही समस्या लक्षात घेऊन रेशनकार्डशी संबंधित महत्त्वाच्या अपडेट्स एसएमएसद्वारे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Register online to get ration card related updates on mobile)
- Sagar Mohalkar News : 5 गोळ्या, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अन् अचानक आलेला ‘शॉक’; सागर मोहळकरच्या मृत्यूचा धक्कादायक घटनाक्रम आला समोर
- Sagar Mohalkar News : १२ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी; कुख्यात गुंड सागर मोहळकरचा ससूनमध्ये मृत्यू!
- जामखेड : लोकन्यायालयामुळे चिमुकल्या ‘श्रध्दा’ला मिळाले आई-वडिलांचे छत्र, कुमटकर दाम्पत्याचा मोठा निर्णय, न्यायाधीश आणि वकिलांची ‘संवेदनशीलता’ ठरली निर्णायक
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: जामखेड बाजार समितीत हरभरा व तुर हमीभाव केंद्र सुरू !
- लाडकी बहीण योजना: फेब्रुवारी मार्चचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट!
त्यामुळे ज्या ग्राहकांचा मोबाईल क्रमांक रेशनकार्डशी संलग्न नसेल, त्यांनी तातडीने खालील प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.
अशी असेल प्रक्रिया…
1) https://nfso.gov.in/State/MH या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
2) तेथे ‘अपडेट युवर रजिस्टर मोबाईल नंबर असा पर्याय दिसेल. त्याखाली चार बॉक्स पाहायला मिळतील.
3) आधार कार्ड नंबर ऑफ हेड ऑफ हाऊसहोल्ड/एनएफएस आयडी या पहिल्या बॉक्समध्ये कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
4) पुढच्या बॉक्समध्ये रेशन कार्ड नंबर लिहा.
5) तिसऱ्या बॉक्समध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव नमूद करून सर्वात शेवटच्या बॉक्समध्ये जो मोबाईल क्रमांक अपडेट करायचा आहे तो टाका.
6) सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सेव्हवर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल,