जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल; पीआय महेश पाटील यांच्यासह ६ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती झाली ? पाहा संपूर्ण यादी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा  : जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. ७ ऑगस्ट २०२५ रोजी सहा पोलीस निरीक्षकांच्या (PI Transfers list 2025 ) जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये जामखेडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक महेश पाटील (Mahesh Patil) यांचा समावेश आहे. (PI Transfers list 2025 maharashtra )

PI Transfers list 2025, Major reshuffle in ahilyanagar district police force, Transfers of 6 police inspectors including PI Mahesh Patil, who has been posted where? See complete list, Ahmednagar news,

पोलिस निरीक्षक बदली 2025 यादी खालीलप्रमाणे :

अनुक्रमांकपोलीस अधिकाऱ्याचे नावसध्याचे नियुक्त ठिकाणबदलीचे / नविन नियुक्ती ठिकाण
1पोनि धनंजय आनंदराव जाधवनेवासा पोलीस ठाणेजिल्हा विशेष शाखा, अहिल्यानगर
2पोनि महेश विष्णू पाटीलनियंत्रण कक्ष, अहिल्यानगरनेवासा पोलीस ठाणे
3पोनि मोरेश्वर लक्ष्मण पेंदामसायबर पोलीस ठाणेदहशतवाद विरोधी पथक अहिल्यानगर
4पोनि अरविंद बळीराम जोंधळेदहशतवाद विरोधी पथक, अहिल्यानगरनियंत्रण कक्ष, अहिल्यानगर
5पोनि देविदास किसन ढुमणे संगमनेर तालुका पोलीस ठाणेसाई मंदिर सुरक्षा, शिर्डी
6पोनि प्रविण पुंडलिक साळुंखेनियंत्रण कक्ष, अहिल्यानगर संगमनेर तालुका पोलीस ठाणे

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने ५ ऑगस्ट २०२५ रोजी घेतलेल्या आस्थापना मंडळाच्या बैठकीत या बदल्यासंदर्भात निर्णय घेतला होता. हा निर्णय महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ चे पोटकलम (२) नुसार व पोलीस अस्थापणा मंडळास मिळालेल्या अधिकारांनुसार घेण्यात आला आहे.


बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी आपले विद्यमान पद सोडून तात्काळ नव्या पदस्थापनेवर हजर राहावे. तसेच, नवीन ठिकाणी रुजू झाल्याची माहिती नियंत्रण कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय, येथे लेखी स्वरूपात सादर करावी. या आदेशाचे पालन न केल्यास शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, असेही बदली आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


बदली होऊनही कर्मचारी जागेवरच

मागील महिन्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यावेळी विविध पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांच्या इतरत्र बदल्या झाल्या. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न केल्यास प्रभारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु, अनेक कर्मचारी अद्याप बदलीच्या ठिकाणी हजर झाले नसून, संलग्न म्हणून काम करत आहेत.

पोलिस उपनिरीक्षकांसह पोलिस अंमलदार, हवालदार, चालक यांच्या मध्यंतरी प्रशासकीय बदल्या करण्यात आलेल्या आहेत. या बदल्यांमुळे काहींची गैरसोय झाली होती. त्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केलेले होते. या अर्जाची दखल घेऊन तसेच कामाच्या सोयीसाठी उपनिरीक्षक व पोलिस हवालदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विनंती बदली झालेल्या ११४ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.