जामखेड : भाजपा युवा नेते पै. सागर भाऊ टकले यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांसाठी पंढरीच्या वारीचे आयोजन !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष तथा लोकप्रिय युवा नेते पै. सागर (भाऊ) टकले यांच्या संकल्पनेतून भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा संगम असलेल्या ‘पंढरीची वारी’ या अभिनव उपक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक अकरामधील नागरिकांसाठी पंढरीच्या वारीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे अवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष असलेले तरूण तडफदार सामाजिक कार्यकर्ते पै सागर भाऊ टकले यांनी जामखेड नगरपरिषद निवडणूकीसाठीची जोरदार तयारी हाती घेतली आहे. त्यादृष्टीने त्यांनी प्रभाग ११ मध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा धडाका लावला आहे. उद्या रविवार दि २ नोव्हेंबर रोजी सागर भाऊ टकले यांच्या संकल्पनेतून प्रभाग ११ मधील नागरिकांसाठी ‘पंढरीची वारी’ या विशेष धार्मिक यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाचे प्रभागातील नागरिकांना दर्शन घडवून आणण्यासाठी युवा नेते पै सागर भाऊ टकले यांच्या टीमने जय्यत तयारी केली आहे. विशेष बसमधून नागरिकांना मोफत पंढरपूर दर्शन घडवले जाणार आहे. सागर भाऊ टकले यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
सागर (भाऊ) टकले यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवत प्रभाग अकरामध्ये प्रत्येकाशी थेट नाळ जोडली आहे. कायम जनतेत राहून त्यांच्या अडी अडचणी सोडवणारा, जनतेच्या हाकेला सदैव धावून जाणारा युवा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली ओळख प्रस्थापित केली आहे. त्यांच्या पाठीशी तरूणाईसह प्रभागातील जेष्ठ नागरिक व महिलांची ताकद मोठ्या प्रमाणात एकवटलेली आहे. प्रभाग अकरामध्ये त्यांनी भाजपमय वातावरण तयार केले आहे. त्यांची उमेदवारी या प्रभागातून प्रबळ मानली जात आहे.