Mumbai Rain News Today LIVE : मुंबईत सकाळपासूनच पावसाचे रौद्ररूप पहायला मिळत आहे. मुंबईत अतिवृष्टी (Heavy Rain) होत असल्याने शहर व उपनगराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मिठी नदीने धोका पातळी (Mithi River Updates) ओलांडल्याने शहराची वाटचाल २६ जुलैच्या महाप्रलयाकडे होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन (Local train) सेवा ठप्प झाली आहे. ठाणे (Thane) कडून मुंबई सीएसटीकडे (CST) जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतील सर्वच रस्त्यांना आणि सखल भागाला नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Mumbai Rain News Today LIVE : मिठी नदीने गाठली धोका पातळी
बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पातळी 3.9 मीटर इतकी वाढली होती. ही बाब लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्रांतीनगर, कुर्ला या परिसरातील सखल भागातील सुमारे 350 नागरिकांचे स्थलांतर हे तात्पुरत्या निवाऱ्याचे ठिकाण असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मगनदास मथुराम मनपा शाळेत करण्यात आले आहे. या ठिकाणी सदर नागरिकांच्या खानपानाची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. (Mumbai Rain News Today LIVE )