अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार, दोघा नराधमांविरोधात गुन्हे दाखल, सहा महिन्यांपासून सुरु होता लैंगिक अत्याचार

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये एका लिंगपिसाट शिक्षकाने गुरु शिष्य नात्याला काळीमा फासत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याची घटना ताजी असतानाच, आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नडमध्ये एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. (Kannad news)

minor student was raped in kannad, case was filed against two murderers,  sexual abuse had been going on for six months, Chhatrapati Sambhaji Nagar latest news

या घटनेत नववीत शिक्षणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांकडून सहा महिन्यांपासून बलात्कार करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणी दोघा नराधमांविरोधात कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कन्नड शहरालगतच्या एका गावात नववीच्या वर्गात शिकणारी पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना आरोपी रामेश्वर कवडे याने तिच्या घरात प्रवेश करुन तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास तुझी बदनामी करेन, तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. तसेच आरोपीने वारंवार बलात्कार केला. ही बाब दुसरा आरोपी मोहन शिंदे याच्या निदर्शनास आली. त्यानेही पीडितेला आपल्यासोबतही शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझ्या आई-वडिलांना सांगतो, असे म्हणत बलात्कार केला.

याबाबत चार दिवसांपूर्वी पीडितेने आई-वडिलांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी कन्नड शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यात आरोपी रामेश्वर कवडे आणि मोहन शिंदे हे गेल्या सहा महिन्यांपासून लैंगिक शोषण करत असल्याचे म्हटले आहे. त्यावरुन दोन्ही आरोपींविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पिंक पथकाचे पोउपनि राम बारहाते करत आहेत.

दोघांनी केला अत्याचार…

रामेश्वर कवडे याने अल्पवयीन पीडित मुलीच्या घरात कोणीही नसल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान तिला बदनामी करण्याची धमकी दिल्याने तिने याबाबत कोठेही वाचता केली नाही. मात्र याची माहिती दुसरा आरोपी मोहन शिंदे याला मिळाली. त्यामुळे त्यानेही पीडितेला आपल्यासोबतही शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझ्या आई-वडिलांना सांगतो, असे म्हणत बलात्कार केला. या घटनेने मुलीला मानसिक धक्का बसला. शेवटी तिने आई-वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली आहे.

जामखेडमध्ये काय घडलं होतं?

अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील साकत येथील लिंगपिसाट नराधम शिक्षक राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरूमकर वय ३० वर्षे याने त्याच्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनीशी शाळेच्या अभ्यासाच्या माध्यमांतून स्नॅपचॅट या सोशल मिडीया साईटच्या माध्यमांतून जवळीक साधली होती. या माध्यमांतून त्याने तिच्याकडून अर्धनग्न फोटो मागवले होते. याच अर्धनग्न फोटोचा वापर करून नराधम शिक्षक विद्यार्थीनीला ब्लॅकमेल करत होता, सदर अर्धनग्न फोटो सोशल मिडीयावर वायरल करण्याची धमकी तो पिडीत विद्यार्थीनीला देत होता.

सदर नराधम शिक्षकाने अर्धनग्न फोटोंचा आधार घेत त्याने पिडीत अल्पवयीन मुलीस 14 जून 2023 रोजी आष्टी येथील हर्षद लाॅजवर नेले. त्या ठिकाणी लिंगपिसाट शिक्षकाने अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध करत बलात्कार केला. कुणाला काही सांगितल्यास अर्धनग्न फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी त्याने पिडीतेला दिली होती. सदर नराधम शिक्षक हा पिडीतेला जानेवारी महिन्यापासून ते 14 जून 2023 असे सहा महिन्यांपासून तीचे अर्धनग्न फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करत होता.

सदर घटनेची बाब उघडकीस होताच लिंगपिसाट शिक्षक राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरूमकर वय ३० वर्षे रा. साकत ता. जामखेड याच्याविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला कलम ३७६ (२) एफ (आय) भादवी सह कलम ४ बालकाच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.