जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा माळशिरस (Malshiras) तालुक्यात भीषण अपघात (Accident) झालाय, म्हसवड – पंढरपुर (Mhaswad Pandharpur) मार्गावरील तांदुळवाडीत (Tandulwadi) भरधाव पिक अप विहीरीत कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत १४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने महाराष्ट्र हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रांजणी गावातील एक कुटूंब सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. ते पिक अपने गावाकडे परतत असताना त्यांच्या गाडीला माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे भीषण अपघात झाला. तांदुळवाडी गावानजीक असलेल्या एका विहिरीत पिकअप गाडी थेट विहीरीत कोसळली. हा थरारक अपघात आज साडे चार ते पाच च्या सुमारास घडला.
माळशिरस तालुक्यात तांदळवाडी गावाजवळ हा अपघात घडला. पिकअप वाहन साधारण ५० ते ६० च्या स्पीडने येत होतं. पिकअपमध्ये एकूण १५ जणं असल्याची माहिती आहे. त्याचवेळी चालकाचं पिकअपवरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन रस्त्याजवळील विहिरीत जाऊन कोसळले. रस्त्यापासून अवघ्या १० फुटाच्या अंतरावर ही विहीर आहे. विहिरीला कोणतीही संरक्षण भिंत नव्हती. त्यामुळे पिकअप थेट विहिरीत कोसळली. या भीषण अपघात १४ जणांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक तरूण व नागरिकांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. प्रशासनाकडून मृतांचा अधिकृत आकडा अजून समोर आलेला नाही.