माणुसकीच्या शिदोरीने हृदय जिंकणारे नेतृत्व – भाजपा युवा नेते सागरभाऊ टकले यांचा हृदयस्पर्शी फोटो व्हायरल!
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । जामखेड नगरपरिषद निवडणूकीचा बिगुल आज ४ रोजी वाजला. निवडणूकीसाठीची आचारसंहिता लागू झाली आहे. नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू झालेली असतानाच, भाजपचे प्रभाग ११ मधील संभाव्य उमेदवार पै. सागर भाऊ टकले यांचा एक हृदयस्पर्शी फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या छायाचित्रात सागर भाऊ टकले हे रस्त्याच्या कडेला बसून एका वयोवृद्ध आजीबाईंचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत. साधेपणात माणुसकी जपणारा हा क्षण अनेकांच्या मनाला भिडला आहे.

जनतेशी थेट संवाद साधण्याची, त्यांच्या समस्या ऐकण्याची आणि त्यावर उपाययोजना करण्याची सागर भाऊंची शैली या फोटोतून स्पष्टपणे जाणवते. त्यांनी प्रभाग ११ मध्ये फिरत असताना प्रत्येक सामान्य नागरिकाशी जवळीक साधली आहे. त्यांची नम्रता आणि संवेदनशील वागणूक हीच त्यांची खरी ओळख बनली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, “सागर भाऊ हे फक्त राजकारणी नाहीत, तर लोकांच्या दुःखात सहभागी होणारे ‘जनसेवक’ आहेत.” वृद्ध महिला, शेतकरी, तरुण आणि महिला वर्ग यांच्यात त्यांनी आपुलकीचं नातं निर्माण केलं आहे. त्यामुळेच या निवडणुकीत ‘जनतेचा भाऊ’ म्हणून सागर भाऊ टकले यांची प्रभागात विशेष ओळख निर्माण झाली आहे.
विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांचे खंदे शिलेदार असलेल्या सागर भाऊ टकले यांनी प्रभागात राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांना तसेच जनसंपर्क मोहिमेला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. जनसंपर्क दौर्यात एका आजीबाईंशी त्यांनी घेतलेली भेट आणि साधलेला संवाद आता चर्चेत आला आहे.
या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत भाजपा युवा नेते पै सागर भाऊ टकले हे रस्त्याच्या कडेला बसून वैजाबाई शिंदे या वयोवृद्ध आजीबाईंशी आपुलकीने संवाद साधताना दिसत आहेत. तर आजीबाई सागरभाऊंच्या डोक्यावर मायेचा स्पर्श करत आशिर्वाद देताना दिसत आहेत. या हृदयस्पर्शी फोटोने प्रभागातील नागरिकांची मने जिंकली आहेत.
राजकारण खुर्चीवर बसून नाही, तर जमिनीवर बसून लोकांच्या हृदयात उतरून केलं जातं हाच संदेश सागरभाऊंच्या या कृतीतून अधोरेखित झाला आहे. विनम्रतेने माणुसकी जपणाऱ्या सागरभाऊंसारखा सच्चा कार्यकर्ता हाच आपल्या हक्काचा नगरसेवक हवाय, अशी भावना प्रभागातील घराघरात जोरदारपणे चर्चेत आली आहे. यामुळे भाजपकडून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची जोरदार चर्चा जामखेड शहरातील जनतेत आहे.
माणुसकी, साधेपणा आणि जनसेवा यांची शिदोरी घेऊन प्रभाग ११ मध्ये काम करत असलेल्या सागरभाऊ टकले यांचा जनाधारात मोठी वाढ होत असल्याचेच चित्र आहे. यामुळे विरोधकांचे धाबे दणाणून गेले आहेत.