जामखेड नगरपरिषद निवडणूक निकाल 2025 : कोण जिंकलं, किती मतांनी? विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी व आकडेवारी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये निवडून आलेल्या सर्व २४ नगरसेवकांमध्ये कोण किती मताने निवडून आले जाणून घेऊयात सविस्तर ! (jamkhed nagarsevak list)

जामखेड नगरपरिषद निवडणूकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक १५ जागा जिंकल्या.जानखेडच्या जनतेने महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वावर पुर्ण विश्वास दाखवत नगरपरिषदेची सत्ता सोपवली.
दुसरीकडे रोहित पवारांच्या पॅनलचा पुरता धुव्वा उडाला.त्यांना फक्त ५ जागा जिंकता आल्या. वंचित बहुजन आघाडीने जामखेडच्या राजकारणात दिमाखात एन्ट्री केली.त्यांचे दोन उमेदवार निवडून आले. शिवसेना व राष्ट्रवादीला एक एका जागेवर समाधान मानावे लागले. अपक्षांना खाते उघडता आले नाही.
नगराध्यक्ष : प्रांजल अमित चिंतामणी – ३६८२ मतांनी विजयी.
जामखेड नगरपरिषदेत विजयी झालेल्या २४ नगरसेवकांना मिळालेले मताधिक्य खालील प्रमाणे
१) सुमन अशोक शेळके – १७ मतांनी विजयी
२) श्रीराम अजिनाथ डोके ६०४ मतांनी विजयी
३) प्रविण विठ्ठल सानप ५०५ मतांनी विजयी
४) प्रिती प्रशांत राळेभात- ८० मतांनी विजयी
५) पोपट दाजीराम राळेभात २७५ मतांनी विजयी
६) सीमा रविंद्र कुलकर्णी १४० मतांनी विजयी
७) प्रा विकी घायतडक २४५ मतांनी विजयी
८) प्रांजल अमित चिंतामणी ८२८ मतांनी विजयी
९) हर्षद भाऊसाहेब काळे ७२४ मतांनी विजयी
१०) वर्षा कैलास माने ९२ मतांनी विजयी
११) संगिता रामचंद्र भालेराव १८ मतांनी विजयी
१२) अरूण हौसराव जाधव २०४ मतांनी विजयी
१३) नंदा प्रविण होळकर ४८८ मतांनी विजयी
१४) मोहन सिताराम पवार ३२ मतांनी विजयी
१५) हिना ईस्माईल सय्यद ५६० मतांनी विजयी
१६) राजेंद्र आजिनाथ गोरे ३०३ मतांनी विजयी
१७) वैशाली अर्जुन म्हेत्रे ४१ मतांनी विजयी
१८) तात्याराम रोहिदास पोकळे ३९६ मतांनी विजयी
१९) मेहरून्निसा शफी कुरेशी १३१ मतांनी विजयी
२०) वसीम इसाक सय्यद ८९६ मतांनी विजयी
२१) संजय नारायण काशिद १००४ मतांनी विजयी
२२) आशाबाई बापू टकले ४४० मतांनी विजयी
२३) जया संतोष गव्हाळे ५४२ मतांनी विजयी
२४) महेश भारत निमोणकर ८१ मतांनी विजयी