मोठी बातमी : थंडावलेल्या भावी नगरसेवकांनो पुन्हा लागा तयारीला, जामखेड नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर,कोणत्या प्रभागात कोणत्या भागाचा समावेश ? जाणून घ्या

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. जामखेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १२ प्रभाग असणार आहेत. त्यातून २४ नगरसेवक निवडले जाणार आहे. नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाणार आहे. मुख्याधिकारी अजय साळवे यांनी आज १८ रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. या रचनेवर हरकती व सूचना घेण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे. दरम्यान मागील तीन वर्षांपासून नगरसेवकपदाचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या ‘पण’ थंडावलेल्या भावी नगरसेवकांना पुन्हा एकदा निवडणूक तयारीसाठी मैदानात उतरावे लागणार आहे.

Jamkhed nagar Parishad draft ward structure announced, which part is included in which ward? Find out,

जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी साळवे यांनी सोमवारी (ता. १८) प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धीची अधिसूचना प्रसिद्ध केली असून, त्यावर ३१ ऑगस्टपर्यंत जनतेच्या हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहेत. हरकती व सुचना नगरपरिषदेला लेखी स्वरूपात सादर केल्यानंतर त्यावर सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.

१ सप्टेंबर ते ८ सप्टेंबरदरम्यान प्राप्त हरकती व सूचनांवर जिल्हाधिका-यांनी नेमलेल्या प्राधिकृत अधिका-यामार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे.९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन, प्राधिकृत अधिका-यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना जिल्हाधिकारी मुख्याधिकाऱ्यांमार्फत १२ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगास सादर करणार आहेत. त्यानंतर २६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोगामार्फत अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे मुख्याधिका-यांकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Jamkhed Nagar Parishad Election 2025 : कोणत्या प्रभागात कोणत्या भागाचा समावेश? जाणून घ्या

प्रभाग क्रमांक एक : जांबवाडी संपूर्ण गाव, माने वस्ती, शिरगिरे वस्ती, शेळके वस्ती भूतवडा संपूर्ण गाव, पांडव वस्ती, गवळी वस्ती, लेहनेवाडी गावठाण, अडाले वस्ती, मगर वस्ती, जगताप वस्ती, दांडगे वस्ती, पवार वस्ती, राळेभात वस्ती (लेहनेवाडी), शिक्षक कॉलनी परिसर, जलशुद्धीकरण केंद्र परिसर, लघुपाटबंधारे कार्यालय परिसर, शासकीय दुध संघ परिसर

प्रभाग क्रमांक दोन : बीड रोड (पूर्व भाग), खडी सेंटर परिसर, विकास नगर, साकत फाटा पूर्व भाग, गौयकर वस्ती, सुपेकर व अडाले वस्ती, धोत्री गाव, काळमोर वस्ती, अडाले वस्ती, सपकाळ वस्ती, मंडलिक वस्ती, राळेभात वस्ती-१. राळेभात वस्ती-२, मोरे वस्ती, तुकाई माळ परिसर, संताजी नगर, शिवाजी नगर, विद्या नगर, मार्केट यार्ड व बैलबाजार परिसर, प्रजापिता ईश्वरी ब्रम्ह कुमारी विश्व विद्यालय परिसर.

प्रभाग क्रमांक तीन : ग्रामीण रुग्णालय, ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पश्चिम भाग परिसर, दत्त नगर, जिल्हा परिषद मराठी मुले व मुलींची शाळा परिसर, जामखेड महाविद्यालय परिवर, जुने तहसिल कार्यालय, जुने पोलिस कार्यालय, नवीन स्टेशन तहसिल कार्यालय परिसर, नवीन पोलिस स्टेशन कार्यालय परिसर, प्राध्यापक कॉलनी, सुखशांती नगर, गोडाऊन गल्ली, बर्फ कारखाना परिसर, कुंभार गल्ली, राळेभात गल्ली, लोकमान्य शाळा परिसर, (नवीन प्राथमिक मराठी मुलांची शाळा) राम मंदिर परिसर, सुतार गल्ली. मल्लीकार्जुन मंदिर परिसर, नवीन नगरपरिषद शेजारील सभागृह, नाना नानी पार्क.

प्रभाग क्रमांक चार : एच. यु. गुगळे कापड दुकान परिसर, जुनी खानावळ गल्ली, कोर्ट गल्ली (उत्तर बाजू), मेन पेठ पूर्व भाग, कोर्ट गल्ली, लोकमान्य वाचनालय परिसर, सोनार गल्ली, मेन पेठ परिसर, जुनी स्टेट बैंक परिसर, सिद्धार्थ नगर, साठे नगर, काझी गहली, विठ्ठल मंदिर परिसर, देशमुख गढी परिसर

प्रभाग क्रमांक पाच : बाळासाहेब मोरे यांचे गाळे व घरापासून ते साहेबराव गायकवाड यांचे कापड दुकान पर्यंतचा परिसर, नागेश शाळेचा परिसर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी परिसर, गोरोबा टाकीज शेजारील परिसर, पारधी गल्ली, बुरुड गल्ली, संतोषी माता मंदिर दक्षिण बाजू कुंभारतळ, बाजारतळ, जुने नगरपरिषद कार्यालय परिसर, दुर्गा माता मंदिर परिसर, बीड कॉर्नर ते सय्यद हाजी मंजूर कमान पर्यंतचा पश्चिमे कडील भाग.

प्रभाग क्रमांक सहा : मिलिंद नगर परिसर, नवीन शिक्षक कॉलनी परिसर (भूतवडा रोड) कान्होपात्रा नगर, आंबेडकर ब्लॉक परिसर, भोसले नगर, तपनेश्वर जि.प.मराठी शाळा परिसर, मिलिंद नगर उत्तरेकडील बाजू, भूतवडा रोड सार्वजनिक शौचालयपर्यंत, तपनेश्वर स्मशानभूमी रोड पूर्व भाग, मिहीर मंगल कार्यालय ते ओम हॉस्पिटल पर्यंत बीड रोड पश्चिम बाजू

प्रभाग क्रमांक सात : संतोषीमाता मंदिर उत्तरेकडील परिसर, काजल साडी सेंटर व उत्तरेकडील परिसर, डांगरे गल्ली शेंडकर गल्ली, वासकर गल्ली, अक्सा मस्जिद परिसर, ढवळे किराणा परिसर, डॉ. पवार हॉस्पिटल परिसर (संजीवनी हॉस्पिटल), महादेव मंदिर परिसर पोकळे यांचे गाळे व पश्चिमेकडील परिसर

प्रभाग क्रमांक आठ : तपनेश्वर रोडकडील कब्रस्तान, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस डेपो, महत्वीर मंगल कार्यालय परिसर, पंचायत समिती कार्यालय परिसर, न्यायाधीश निवास परिसर, खाडेनगर, घोडके हॉस्पिटल किनारा हॉटेल परिसर, जुनी पोकळे वरती, आनंद कॉलनी, अर्बन बैंक परिसर, मुरानी कॉलनी रामेार परिसर, कॉलनी, तपनेश्वर कॉलनी, नुरानी मदरसा, मारुती मंदिर परिसर, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, आयकॉन सिटी परिसर, ईदगाह मैदान परिसर, शासकीय गोडाऊन परिसर, BSNL ऑफिस परिसर, आंबेडकर ब्लॉक परिसर,जामखेड बस स्थानक परिसर, बैंक ऑफ महाराष्ट्र परिसर, वर्धमान सोसायटी, जामखेड सेंट्रल कॉम्प्लेक्स, स्वामी समर्थ मंदिर.

प्रभाग क्रमांक नऊ : स्वामी समर्थ मंदिर परिसर, काटकर वस्ती, गणेश बाग परिसर, हजारे तालीम परिसर, चापागा पेट्रोल पंप व पूर्वेकडील भाग, साईधन मंगल कार्यालय परिसर, वृंदावन लॉन्स परिसर, वडाची वस्ती, अहिल्यावरती परिसर, खडकवाडी, म्हेत्रे वस्ती, गणेश नगर, उत्कर्ष हॉटेल परिसर, कोठारी पेट्रोल पंप, नविन पोकळे वस्ती, साई गार्डन परिसर, फुलमाळा परिसर, स फुले बदती जल कुंभच्या तरेकडील भाग, फयादे गेजर या घराचा परिसर, खंडोबा मंदिराचे उत्तरेकडील परिसर, काटकर मेजर यांचे घराजवळील परिसर, पशुवैद्यकीय दवाखान्याच्या दधिणेकडील बाजू, रामेश्वर हॉस्पिटल परिसर, टेकाळे नगर, डॉ. झगडे हॉस्पिटल परिसर.

प्रभाग क्रमांक दहा : सदाफुले वस्ती, टेकाळे नगर, रामेश्वर हॉस्पिटल परिसर, कुरेशी नगर, जिजामाता वी. एड. कॉलेजचे पश्चिमेकडील परिसर, सतीआई मंदिर परिसर, शनी मंदिर परिसर, जुम्मा मस्जिद परिसर, मुस्लीम गल्ली, सय्यद नगर, ख्वाजा नगर, चौरे गल्ली.

प्रभाग क्रमांक अकरा : महादेव गल्ली (दक्षिण बाजू) मुंजोबा गल्ली, नागेश्वर नगर, गोरक्षनाथ नगर, साईनगर, गुलमोहर सोसायटी, बोराटे वस्ती, वेलेकर वस्ती, अचल वस्ती, वटेवाडी गात, खरात वस्ती, काळे वस्ती, जमादारवाडी गाव, नेटके वस्ती, समता नगर परिसर (पूर्वेकडील वाजू) नवीन कोर्ट परिसर, नवीन म्हाडा घरकुल वसाहत

प्रभाग क्रमांक बारा : इंदिरानगर, दुर्गामाता सोसायटी, करमाळा रोड पूर्व वाजू, वैदू वस्ती द्रोणागिरी सोसायटी, निमोणकर वस्ती १. निमोणकर वस्ती- २, आजबे वस्ती, चुंबळी, गडदे वस्ती, हुलगुंडे वस्ती, बालाजी स्टोन क्रेशर परिसर, गिरमे फार्म परिसर, आयटीआय परिसर, काळंगे वस्ती, कोल्हे वस्ती, गैस गोडाऊन परिसर, खंडोबा बस्ती, जावळे मळा, राऊत मळा, डॉ. नजीराबानो हॉस्पिटल परिसर व वसाहत