Jamkhed Flood News : अधिकाऱ्यांची टीम घेऊन राम शिंदे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर, पूरग्रस्त भागांची पाहणी केली आणि जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना धीर दिला.
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : “नैसर्गिक संकटाच्या काळात घाबरून न जाता धैर्याने सामना करा, या संकटकाळात मी तुमच्या सोबत आहे, धीर सोडू नका,घाबरू नका, प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठलीही जीवित वा पशुहानी होऊ नये यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी.आपल्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या पाठबळाने आपण हे संकट नक्कीच पार करू, असे सांगत विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना धीर व विश्वास दिला.

अधिकाऱ्यांची टीम घेऊन विधानपरिषद सभापती प्रा.राम यांनी मंगळवारी जामखेड तालुक्यातील मोहरी,माळेवाडी, दिघोळ, जातेगाव, वंजारवाडी, तरडगाव, सोनेगाव, धनेगाव, तेलंगशी जायभायवाडी, दरडवाडी खर्डा या अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
जामखेड तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतपीक, घरे, विहिरी, पशुधन यांचे मोठे नुकसान झाले असून ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या नुकसानीची विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज (ता. २३ सप्टेंबर) प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.

ग्रामस्थांशी संवाद साधताना प्रा. शिंदे यांनी स्पष्ट सूचना दिल्या की, सर्व शेतपीक, जमीन, घरे, विहिरी, पशुधन आणि अन्य नुकसानीचे तातडीने व सरसकट पंचनामे करून मदत तत्काळ पोहोचवावी. कोणताही नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही,याची ग्वाही त्यांनी दिली.
सभापतींनी दरडवाडी येथे पुराने नुकसान झालेल्या पुलाची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. मोहरी येथील तुटलेल्या तलावाचे निरीक्षण करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. दिघोळ व जातेगाव येथे मांजरा नदीच्या पुराने वाहून गेलेल्या शेतजमिनी, नुकसानग्रस्त घरे व घरातील वस्तूंची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

जातेगाव, वंजारवाडी, सोनेगाव व खर्डा या भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे शेतपीक, घरे, विहिरी, पशुधन यांचे मोठे नुकसान झाले असून ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन गंभीरपणे बाधित झाले आहे. पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून वाहतूक व दळणवळणावरही गंभीर परिणाम झाला आहे. या भागाची शिंदे यांनी पाहणी केली.
या भागात झालेल्या नुकसानीचे पाहणी करत शिंदे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे झालेले नुकसान तसेच रस्त्यांची झालेली दुरवस्था त्यांनी प्रत्यक्ष पाहिली.

नागरिकांनी आपल्या समोरील अडचणी सांगितल्या असून त्यांचा योग्य तो निपटारा करण्यासाठी प्रशासन तत्परतेने कार्यरत आहे. प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, या सर्व भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत पोहोचवावी. शेतकरी, कामगार व सामान्य नागरिक यांना दिलासा मिळणे अत्यंत गरजेचे असून कोणताही नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही असे यावेळी शिंदे म्हणाले.
जामखेड तालुक्यातील जातेगाव, वंजारवाडी, सोनेगाव व खर्डा या भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे शेतपीक, घरे, विहिरी, पशुधन यांचे मोठे नुकसान झाले असून ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन गंभीरपणे बाधित झाले आहे.अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने दैनंदिन वापरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही घरांची पडझड झाली आहे तसेच अनेक बंधारे व रस्ते वाहून गेले आहेत. पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून वाहतूक व दळणवळणावरही गंभीर परिणाम झाला आहे.

याशिवाय माळेवाडी, दिघोळ, जातेगाव, वंजारवाडी, तरडगाव, सोनेगाव, धनेगाव, जायभायवाडी, तेलंगशी आणि दरडवाडी या गावांमध्येही अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्या गावांतील नागरिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत प्रशासनाला तातडीने मदत कार्यवाही करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.
नुकसानग्रस्त भागातील नागरिकांनी आपल्या समोरील अडचणी सांगितल्या असून त्यांचा योग्य तो निपटारा करण्यासाठी प्रशासन तत्परतेने कार्यरत आहे. प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, या सर्व भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत पोहोचवावी. शेतकरी, कामगार व सामान्य नागरिक यांना दिलासा मिळणे अत्यंत गरजेचे असून कोणताही नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही याची हमी शिंदे यांनी दिली आहे.
या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कुकडी सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता अल्का अहिरराव, कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, तहसीलदार मच्छिंद्र पांडुळे, बांधकाम विभागाचे शशीकांत सुतार यांच्यासह महसूल, कृषी, वन व जलसंधारण विभागातील अधिकारी, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.