IAS Transfers Maharashtra 2025 : 20 वर्षांत 24 बदल्या ! IAS तुकाराम मुंडे यांची दिव्यांग कल्याण विभागात बदली !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा | मुंबई | ५ ऑगस्ट २०२५
महाराष्ट्राच्या (Maharashtra) प्रशासनातील अत्यंत चर्चेत राहिलेले आणि बेधडक कामामुळे अनेकदा वादात सापडलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे (Tukaram Mundhe IAS)  यांची पुन्हा एकदा बदली (Transfer) करण्यात आली आहे. त्यांच्या २० वर्षांच्या सेवेत त्यांची ही २४ वी बदली आहे. सरकारने त्यांची असंघटित कामगार विभागातून दिव्यांग कल्याण विभागात सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS Transfers Maharashtra 2025, 24 transfers in 20 years, IAS Tukaram Munde transferred to the Divyang Welfare Department,

तुकाराम मुंडे हे २००५ बॅचचे IAS अधिकारी असून त्यांनी नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी काम केलं आहे. पण त्यांच्या कडक आणि नियमप्रिय कामकाजामुळे राजकीय व प्रशासकीय पातळीवर त्यांच्यावर वारंवार बदलीची वेळ येत राहिली. काही वेळा तर ६ महिन्यांच्या आत त्यांची बदली झालेली आहे.

तुकाराम मुंडे यांची बदली कुठे झाली?

जुनं पद: असंघटित कामगार विभाग, सचिव

नवीन पद: दिव्यांग कल्याण विभाग, सचिव

या बदल्यामुळे आता मुंडे यांच्याकडे राज्यातील दिव्यांग व्यक्तींशी संबंधित योजना, निधी वितरण, आणि सुधारणा धोरणांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आली आहे.

IAS बदल्या 2025 मध्ये लक्षवेधी घटना

महाराष्ट्र शासनाने नुकत्याच केलेल्या प्रशासनिक बदल्यांमध्ये तुकाराम मुंडे यांच्यासह इतर चार अधिकाऱ्यांचीही बदली झाली आहे. मात्र, मुंडे यांची बदली ही सर्वात जास्त चर्चेची ठरली आहे.

आयएएस बदल्या 2025 ऑगस्ट

1. तुकाराम मुंढे (आयएएस: आरआर: 2005) विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई यांना सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

2. नितीन काशीनाथ पाटील (आयएएस: एससीएस: 2007) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांना विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

3. अभय महाजन (आयएएस: नॉन-एससीएस: 2007) विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई यांना व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

4. ओंकार पवार (आयएएस: आरआर: 2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

5. आशा अफजल खान पठाण – सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर यांना महासंचालक, वनमती, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि त्यांना सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूरचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

तुकाराम मुंडे यांची खासीयत काय ?

तुकाराम मुंढे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणच्या प्रशासनाला, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. सरकारी कार्यालयात उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसतो. तसेच कार्यालयातील लाल फितीचा कारभार संपवण्यावर मुंढे यांचा भर असतो. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय ते काम करतात.

दिव्यांग कल्याण विभाग तसा दुर्लक्षित विभाग. मात्र तुकाराम मुंडे हे या खात्याचे सचिव म्हणून काम करणार आहेत. त्यामुळे आपल्या साध्यासुध्या कामासाठी मंत्रालयाच्या फेऱ्या मारणाऱ्या दिव्यांग बांधवांची प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारातून सुटका होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.