Havaman Andaj Today : पुढील ४ दिवस धोक्याचे, वीजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज, जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. दोन दिवसांपासून जामखेड तालुक्यासह जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. हा पाऊस पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार आहे. जिल्ह्यात वीजांच्या गडगडाटासह जोरदार ते मध्यम पावसाचा हवामान अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उडीद काढणीला आलेला असतानाच पावसाचे आगमन झाल्याने जामखेड तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.

Havaman Andaj Today, next 4 days are dangerous, heavy rain with thunder and lightning is expected, yellow alert issued for ahilyanagar district, Ahmednagar, karjat Jamkhed News,

भारतीय हवामान खात्याने १२ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत जिल्ह्यात वीजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

आज (दि. १२ ऑगस्ट) दुपारी ३ वाजता जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये पुढीलप्रमाणे विसर्ग सुरू आहे – भिमा नदी (दौंड पूल) – ४०२३ क्युसेक, सीना नदी (सीना धरण) – ३६४ क्युसेक. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भिमा, प्रवरा, गोदावरी, घोड, सीना तसेच मुळा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांची पाणीपातळी वाढू शकते. मुळा नदीपात्रातील कोतूळ येथून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पुढील दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे –

  • मेघगर्जना, वीजा किंवा वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली किंवा त्याजवळ थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
  • वादळादरम्यान विद्युत उपकरणे वापरू नयेत व वीजेच्या सुवाहक भागांपासून दूर राहावे.
  • मोकळे मैदान, टॉवर, विद्युत खांब, धातूची कुंपणे, लटकणाऱ्या केबल्स यांपासून दूर राहावे.
  • जाहिरात फलकांच्या आसपास थांबू नये.
  • मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून डोके व कान झाकावे.
  • धरण व नदी परिसरात पर्यटनासाठी जाऊ नये, पाण्यात उतरू नये व धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.
  • नदी, ओढा, नाले काठावरील नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, पाण्यावरून वाहणारे पूल ओलांडू नयेत.
  • मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये थांबू नये.
  • अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची शक्यता असल्याने डोंगरपायथ्याशी राहणाऱ्यांनी वेळीच स्थलांतर करावे, घाटरस्त्याने प्रवास टाळावा.
  • शेतीमाल व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य नियोजन करावे.

आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या पोलीस ठाणे किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्ष – दूरध्वनी क्रमांक १०७७ (टोल फ्री), ०२४१-२३२३८४४, २३५६९४० उपलब्ध आहेत.

आज महाराष्ट्रात पाऊस : पुढील 4 दिवसांचा पावसाचा अंदाज

महाराष्ट्रातील दक्षिण कोकण-गोवातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.या दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ताशी ३०-४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.”

राज्यात सोळा ऑगस्टला महत्वाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता मुंबई येथील हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या काळात नागरिकांना दक्षता घ्यावी लागणार आहे.

16 ऑगस्टला अति मुसळधार पाऊस पडणार!

दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये, उत्तर कोकण जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज वादळ आणि विजांचा कडकडाट होणार
“कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे.

आज ‘या’ भागात मुसळधार पाऊस पडणार
दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ताशी ३०-४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.”

आज पावसाची कशी असेल स्थिती
१३ ऑगस्ट रोजी कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकटात होऊ शकतो. विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.

१४ ऑगस्टला कसा असेल पाऊस

१४ ऑगस्ट रोजी कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या दोन्ही विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भाच बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहेत तर तुरळख ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता आहे.

१५ ऑगस्टला कसा असेल पाऊस

१५ ऑगस्टला कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.