ganpatipule beach Accident : संभाजीनगरचे ८ पर्यटक गणपतीपुळे समुद्रात बुडाले, तिघांना वाचवण्यात यश, पाच जण बेपत्ता, वेगाने शोधकार्य सुरु
Ganpatipule Beach Accident News Marathi : जामखेड टाइम्स वृत्तसेवा : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे समुद्रकिनारा येथे एक दुर्दैवी घटना घडली असून संभाजीनगर येथील पाच पर्यटक समुद्रात बुडाल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाने तात्काळ बचाव व शोधमोहीम सुरू केली आहे.ganpatipule beach news

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून एकूण १९ जणांचा एक मोठा गट शनिवारच्या सुट्टीनिमित्त गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आला होता. सकाळच्या सुमारास या गटातील काही पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर गेले आणि पाण्यात उतरले. मात्र, याच वेळी समुद्रात अचानक वाढलेल्या लाटांचा आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज पर्यटकांना आला नाही.
त्यामुळे त्यातील ८ जण पाण्यात बुडाले त्यातील तिघांना वाचवण्यात यश आले आहे. तर पाच जण वेगाने खोल पाण्याकडे वाहून गेले आणि काही क्षणांतच पाण्याच्या प्रवाहात नजरेआड झाले. यानंतर आरडाओरडा होताच स्थानिक नागरिक, बचाव पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (ganpatipule beach today news)
घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक प्रशासन, लाइफगार्ड आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली. बुडालेल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू असून बोटी आणि अन्य साधनांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. (ganpatipule beach latest news )
या घटनेमुळे समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने पर्यटकांना समुद्रात उतरताना काळजी घेण्याचे आणि धोकादायक भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
बेपत्ता असलेल्या पर्यटकांची नावे
1. आदित्य राऊत
2. यश कांबळे
3. अनिकेत हिवराळे
4. प्रेम आदमाने
5. आनंद नरवडे
या पाचही तरुणांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून या घटनेमुळे स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे.