मोठा निर्णय : महाराष्ट्रात 105 किमीचा नवीन एक्सप्रेस वे मंजूर, वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग एक्सप्रेस वे चा फायदा काय ? खर्च किती ? कोणत्या भागातून जाणार ? जाणून घ्या सविस्तर

Vadhavan Port -Samruddhi Mahamarg Freight Corridor | राज्याच्या औद्योगिक आणि कृषी विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने बुधवारी मोठा निर्णय घेतला.पालघर (Palghar) जिल्ह्यातील वाढवण बंदर (Vadhavan port) ते समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg ) या फ्रेट कॉरिडोर (Freight Corridor) प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी (Cabinet decision) देण्यात आली. प्रकल्पाचा आराखडा (DPR) व भूसंपादन प्रक्रिया राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Big decision,105 km new expressway approved in Maharashtra, what are the benefits of Vadhavan Bandar to Samruddhi Mahamarg Expressway? How much does it cost? Through which area will it pass? Know in detail

वाढवण बंदर (Vadhavan Bandar) आणि समृद्धी महामार्ग (Samruddhi Expressway) यांना जोडणाऱ्या 105 किलोमीटर लांबीच्या नव्या फ्रेट कॉरिडोर (Goods Transport Corridor) प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ ४ ते ५ तासांऐवजी फक्त १ ते १.५ तासात होणार असून, उद्योग, कृषी आणि वाहतूक क्षेत्राला मोठा चालना मिळणार आहे.

वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग एक्सप्रेस वे चा खर्च किती ?

वाढवण बंदर (तवा,पालघर) ते समृध्दी महामार्ग (भरवीर,नाशिक) हा एक्स्प्रेसवे प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) मार्फत हाती घेतला जाणार आहे. गृहनिर्माण आणि शहरी विकास महामंडळ (हुडको) कडून या प्रकल्पासाठी १,५०० कोटी रुपयांचे कर्ज उभारले जाणार असून या कर्जासोबतच मंत्रिमंडळाने २,५२९ कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मान्यता दिली. प्रकल्पाचे काम तीन वर्षांत पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. लवकरच फ्रेट कॉरिडोरचा विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) तयार केला जाणार आहे. शेतजमिनी संपादन, पर्यावरणविषयक मंजुरी व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने प्रत्यक्ष काम लवकर सुरू होण्याची शक्यता आह.

वाढवण बंदर हे भारतातील प्रस्तावित डीप सी पोर्ट असून, याच्या उभारणीमुळे देशातील पश्चिम किनाऱ्यावर नवा जागतिक व्यापारद्वार उघडणार आहे. वाढवण बंदरातून आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीद्वारे येणारा माल देशाच्या सर्व भागात जलद गतीने पोहोचण्यासाठी वाढवण बंदर थेट समृद्धी महामार्गाशी जोडण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारने मंजूरी दिली आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सध्या सागरमाला प्रकल्पांतर्गत वाढवण बंदर ते तवा पर्यंत ३२ किमी महामार्गाचे काम हाती घेतले आहे. समृद्धी महामार्गावरून वाढवण बंदरात पोहोचण्यासाठी भरवीर-अमाणे मार्गे वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गावर जावे लागते. त्यामुळे सुमारे ८२ किमीचा अनावश्यक प्रवास करावा लागतो. वाढवण बंदरातून भविष्यात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा विचार करता, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वाहतुकीसाठी योग्य असा महामार्ग बांधणे अत्यंत आवश्यक होते. त्यानुसार सरकारने वाढवण बंदर (तवा,पालघर) ते समृध्दी महामार्ग (भरवीर,नाशिक) या एक्स्प्रेसवेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली.

वाढवण बंदर (तवा,पालघर) ते समृध्दी महामार्ग (भरवीर,नाशिक) हा एक्सप्रेस वे पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा तालुक्यांमधून आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यांमधून जाणार आहे. या महामार्गामुळे, तवा भरवीर ते वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवे हे अंतर १८३.४८ किमी ऐवजी १०४.८९८ किमी होईल. यामुळे, तवा आणि भरवीरमधील अंतर चार-पाच तासांवरून १-१.५ तासांपर्यंत कमी होईल, ज्यामुळे वाहतुकीच्या वेळेत मोठी बचत होईल.

वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग एक्सप्रेस वे चा फायदा काय ?

  1. वाहतूक कार्यक्षमतेत वाढ : जलद मालवाहतूक होणार असल्याने उद्योगांना वेळेवर कच्चा माल व उत्पादन पोहोचवणे सोपे होईल.
  2. शेती क्षेत्राला चालना : विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा शेतमाल थेट बंदरावर जलद पोहोचेल, त्यामुळे निर्यातीच्या संधी वाढतील.
  3. उद्योगधंद्यांना गती: वाढवण पोर्टमार्गे मोठ्या प्रमाणात आयात-निर्यात व्यवहार शक्य होणार असून, या परिसरात लघुउद्योग व वाहतूक आधारित व्यवसायांना नवसंजीवनी मिळणार.
  4. संपूर्ण कोकण व उत्तर महाराष्ट्राचा विकास : समृद्धी महामार्गाशी वाढवण बंदराची थेट जोडणी झाल्यामुळे नाशिक, पालघर, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांना नव्या संधी उपलब्ध होतील.
  5. देशांतर्गत व्यापारात मोठी वाढ होऊन आर्थिक समृद्धीचे नवे दालन खुले होईल.

वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग एक्सप्रेस वे कोणत्या भागातून जाणार ?

हा कॉरिडोर नाशिक व पालघर जिल्ह्यांतून जाणार असून, या भागातील शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना मोठा फायदा होणार आहे. शेतमाल थेट बंदरापर्यंत जलद पोहोचवता येईल, तसेच निर्यात व आयात प्रक्रियेत गती येईल. त्यामुळे कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल. जलद दळणवळणामुळे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील लघु, मध्यम आणि अवजड औद्योगिक कारखाने, कृषी संस्था, शैक्षणिक संस्था, आयटी कंपन्या आणि कृषी-औद्योगिक केंद्रांना फायदा होईल. यामुळे स्थानिकांना चांगला रोजगार आणि चांगली बाजारपेठ मिळेल,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

समृद्धी’तून ‘समृद्धी’कडे औद्योगिक गुंतवणुकीला चालना

वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग जोडणारा 105 किमीचा फ्रेट कॉरिडोर महाराष्ट्रासाठी विकासाचा नवीन मार्ग ठरणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाची वेळ कमी होणार नाही, तर उद्योग, शेतकरी आणि वाहतूकदार यांच्यासाठी नव्या संधीचे दार खुले होणार आहे. उत्तर महाराष्ट्र,मराठवाडा व विदर्भातील माल जलमार्गाने परदेशात पाठवण्यासाठी वाढवण बंदराचा मोठा उपयोग होणार आहे. बंदर आणि समृद्धी महामार्ग यांचा समन्वय झाल्यास नवीन उद्योगधंदे, गोदामे, प्रक्रिया केंद्रे उभारली जातील. त्यामुळे स्थानिक रोजगारात वाढ होईल.

वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग फ्रेट कॉरिडोर हा प्रकल्प केवळ वाहतूक सुधारण्यापुरता मर्यादित नाही. तो महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा मुख्य दुवा ठरणार आहे. या कॉरिडोरमुळे देशांतर्गत व्यापारात मोठी वाढ होऊन आर्थिक समृद्धीचे नवे दालन खुले होईल. सध्या मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक परिसरात मालवाहतुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी टळेल. कारण मालवाहतूक वाहने याच स्वतंत्र मार्गाने धावतील. परिणामी इंधन बचत, वेळ वाचवणे आणि प्रदूषणात घट होणार आहे.

FAQ

वाढवण बंदर–समृद्धी महामार्ग फ्रेट कॉरिडोर म्हणजे काय?

वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग (भरवीर, नाशिक) या दरम्यान प्रस्तावित १०५ किमी लांबीचा मालवाहतूक महामार्ग (Freight Corridor) आहे. यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय माल वाहतूक जलद गतीने होईल.

वाढवण बंदर–समृद्धी फ्रेट कॉरिडोर प्रकल्पाची एकूण लांबी किती आहे?

हा महामार्ग सुमारे 105 किलोमीटर लांब असून, तो पालघर जिल्ह्यातील तवा (वाढवण बंदर) पासून नाशिक जिल्ह्यातील भरवीर (समृद्धी महामार्ग) पर्यंत असेल.

फ्रेट कॉरिडोर प्रकल्प कोणत्या संस्थेमार्फत राबविण्यात येणार आहे?

फ्रेट कॉरिडोर प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मार्फत राबविण्यात येणार आहे,

वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग जोडणीचा फायदा काय होणार?

यामुळे वाहतूक वेळ ४–५ तासांवरून १–१.५ तासांपर्यंत कमी होणार आहे. उद्योग, शेती आणि वाहतूक क्षेत्राला गती मिळेल. विशेषतः नाशिक, पालघर, विदर्भ आणि मराठवाडा या भागांना फायदा होईल

वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग एक्सप्रेस वे कोणत्या भागातून जाणार ?

वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग एक्सप्रेस वे (फ्रेट कॉरिडोर प्रकल्प) पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी भागातून जाणार आहे.

हा प्रकल्प किती वर्षांत पूर्ण होणार आहे?

3 वर्षांत

वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे?

वाढवण बंदर हे पालघर जिल्ह्यातील तवा येथे आहे. हे एक प्रस्तावित डीप सी पोर्ट आहे.

वाढवण फ्रेट कॉरिडोरची एकूण गुंतवणूक किती आहे?

प्रकल्पासाठी ₹4,029 कोटींची एकूण तरतूद असून, यामध्ये ₹1,500 कोटी HUDCO कर्ज आणि ₹2,529 कोटी राज्य सरकारचा निधी आहे.