London Google office photo । गुगलचे लंडनमधील आलिशान ऑफीस, Google CEO सुंदर पिचाईकडून ऑफिसचे फोटो शेअर
London Google Office Photo : गूगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO sundar pichai) हे इंस्टाग्रामवर (Instagram post) नेहमी ॲक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या पोस्ट ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.
नुकतेच सुंदर पिचाई यांनी लंडन (London Google office photo) येथील गूगल कंपनीच्या ऑफिसचे फोटो सोशल मीडियार शेअर केले आहे. लंडनमधील सेंट्रल सेंट गेल्समधील गूगलच्या या ऑफिसमध्ये लग्झरी सुविधा आहेत तसेच ऑफिसच्या बिल्डींगमध्ये रेस्टॉरंट आणि कॅफे देखील आहे.
सुंदर पिचाई यांनी ऑफिसचे फोटो शेअर करून माहिती दिली की, या ऑफिसमध्ये एकूण 10,000 कर्मचारी काम करू शकतात. लंडनमधील या ऑफिसमध्ये सध्या 7,000 कर्मचारी काम करत आहेत. गूगल कंपनीनं हे ऑफिस 7500 कोटी रूपयांना खरेदी केले आहे. या ऑफिस बरोबरच गूगलचं मॅनचेस्टर येथे देखील ऑफिस आहे.
- Sagar Mohalkar News : 5 गोळ्या, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अन् अचानक आलेला ‘शॉक’; सागर मोहळकरच्या मृत्यूचा धक्कादायक घटनाक्रम आला समोर
- Sagar Mohalkar News : १२ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी; कुख्यात गुंड सागर मोहळकरचा ससूनमध्ये मृत्यू!
- जामखेड : लोकन्यायालयामुळे चिमुकल्या ‘श्रध्दा’ला मिळाले आई-वडिलांचे छत्र, कुमटकर दाम्पत्याचा मोठा निर्णय, न्यायाधीश आणि वकिलांची ‘संवेदनशीलता’ ठरली निर्णायक
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: जामखेड बाजार समितीत हरभरा व तुर हमीभाव केंद्र सुरू !
- लाडकी बहीण योजना: फेब्रुवारी मार्चचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट!
गुगलच्या चीफ फायनान्शिअल ऑफिसर रुथ पोराट यांनी ऑफिसबद्दल सांगितलं, ‘गेल्या 20 वर्षांपासून लंडन येथे काम केल्याबद्दल आम्हाला खूप आभिमान वाटतो. ‘ गेल्या वर्षी, सप्टेंबर महिन्यामध्ये गूगलने न्यूयॉर्कमधील व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मॅनहॅटन येथील सेंट जॉन टर्मिनल विकत घेतले.