जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापतीसह आठ जणांविरोधात गुन्हे दाखल , जामखेडमधील व्यापाऱ्यांस 50 लाखांची मागणी करत केली मारहाण

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : 50 लाखांच्या मागणीसाठी जामखेड शहरातील प्रसिध्द व्यापारी कुटूंबाला सातत्याने धमकावणे तसेेच मारहाण केल्याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला आठ जणांविरोधात कलम 387 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आरोपींमध्ये जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापतीचा समावेश आहे. संबंधित प्रकरण उघडकीस येताच राजकीय आणि व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

case has been filed against eight persons including the former chairman of Jamkhed Panchayat Samiti, traders in Jamkhed were beaten up demanding 50 lakhs,

जामखेड शहरातील प्रसिध्द व्यापारी कुटूंब असलेल्या अंदुरे कुटुंबाचे जामखेड शहरात शितल कलेक्शन,शितल ट्रेडर्स, शितल सुपर मार्केट, मे. रावसाहेब बाबुराव अंदुरे भांड्याचे दुकान शाखा नं. 1 जून्या बस स्टॅण्ड समोर, जामखेड व मे. रावसाहेब बाबुराव अंदुरे भांड्याचे दुकान शाखा नं. 2 जूना कोर्ट रोड, जामखेड अशी पाच दुकाने आहेत.

अंदुरे कुटुंबाकडे जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी 50 लाखांची मागणी केली होती. या पैश्यांच्या मागणीसाठी अंदुरे कुटुंबातील सदस्यांना सातत्याने मारहाण आणि दमबाजी करण्यात येत होती. त्यामुळे जामखेड पोलिस स्टेशनला आठ जणांविरोधात कलम 387 अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत.

याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला सागर उमाकांत अंदुरे वय 31 वर्षे धंदा व्यापारी रा. खाडेनगर, जामखेड यांनी जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, 16 ऑगस्ट 2022 रोजी भगवान मुरुमकर रा. साकत ता. जामखेड यांनी माझे वडील उमाकांत रावसाहेब अंदुरे यांना फोन करून म्हणाले की, शेठ तुम्ही कुठे आहात? अशी विचारणा करुन तुमची भेट घ्यायची आहे, असे म्हणाल्याने वडीलांनी त्यांना सांगितले की, मी सध्या नगरमध्ये आहे.आल्यानंतर भेटतो,असे म्हणाले होते. परंतु वडीलांनी कामात असल्याने भगवान मुरुमकर यांची भेट घेतली नाही.

त्यानंतर काही दिवसांनी दि. 24 ऑगस्ट 2022 रोजी भगवान मुरुमकर हे स्वतः आमच्या मे. रावसाहेब बाबुराव अंदुरे या भांड्याच्या दुकानात आले.त्यावेळी दूकानातमध्ये मी, वडील- उमाकांत अंदुरे व चुलते – शशिकांत अदुरे असे आम्ही तिघे तेथे उपस्थित होतो. त्यावेळी दुकानात आल्यावर मुरुमकर वडीलांना बोलले की, तुम्ही मला भेटायला आले नाहीत, म्हणुन मीच तुम्हाला भेटायला आलो आहे, असे म्हणून तुम्हाला जास्त माज आला आहे असे म्हणाले.

शेठ तुमचे पाच दुकान आहेत.पाच दुकाने सध्या जोरात चालतात. दिवाळी सण जवळ आला आहे, तुम्ही चांगला धंदा करणार व पैसे कमवणार. तुम्ही मला एका दुकानाचे दहा या प्रमाणे पन्नास लाख रुपये (50,00000/ ) हे मला दिवाळीच्या एक दिवस आधी पर्यंत द्या. जर पैसे नाही दिले तर मी तुम्हाला, तुमच्या परिवारातील माणसांना खल्लास करेल, तसेच दुकानाची तोडफोड करेन. माझ्याकडे अनेक प्रकारचे गुंड आहेत. माझे कॉन्टॅक्ट लय मोठे आहेत.

पंन्नास लाखापैकी दहा लाख रुपये मला येत्या दोन दिवसांत पाहीजेत.जर ही गोष्ट कोणाला सांगितली किंवा पोलीसांकडे गेलात, तर याचे परिणाम वाईट होतील,असे बोलून भगवान मुरुमकर हे तेथुन निघुन गेले.

त्यानंतर दि 26ऑगस्ट 2022 रोजी भगवान मुरुमकर यांनी मला फोन केला व म्हणाले की, तुझ्या बापाला सांगितलेले काही कळत नाही, त्याला काही फरक पडत नाही. आता मी पोरं पाठवून तुम्हाला मारहाण करणार आहे. तुमच्या अंगावर कपडे पण ठेवणार नाही. तुम्हा सर्वांना खल्लास करून टाकणार, अशी धमकी दिली. तसेच तुझ्या चुलत्याला पण समजावुन सांग असे सांगुन त्यांनी फोन ठेवला.

27 ऑगस्ट 2022 रोजी भरत जगदाळे रा. जामखेड याने आमच्या मे. रावसाहेब बाबुराव अंदुरे भांड्याचे दुकान शाखा नं. 1 या जून्या बस स्टँण्ड समोरील दुकानात येवुन माझे चुलते शशिकांत अंदुरे यांना बोलावून घेतले आणि म्हणाला की, शेठ तुम्हाला भगवान मुरुमकर यांनी दहा लाख रुपये मागीतले होते, त्याचे काय झाले ? दहा लाख द्यायला काय लई जड जातयं का? कशाला जीवाशी खेळतायं ? जीव धोक्यात घालताय, देवुन टाका पैसे, लई डेंजर माणुस आहे तो, त्याने आदेश दिला की, मी व माझ्यासारखे अनेक पोरं तुमच्यावर तुटुन पडतील. तुमच्या जीवाचे काहीपण बरे वाईट करतील, तुमचे दुकान फोडतील, देवुन टाका गप पैसे, असे म्हणून तो तेथून निघून गेला. सदर झालेली घटनेची माहीती चुलते शशिकांत यांनी मला दिली होती.

तसेच दि. 31ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास वडील – उमाकांत हे साई अँटो पेट्रोल पंपाच्या मागे आमच्या मालकीच्या गोडावून मध्ये बसलेले असताना विक्रम डाडर रा. जामखेड, सोनु वाघमारे रा-जामखेड व एक अनोळखी इसम असे तिघे जण तिथे आले, वडीलांना म्हणाले की, काय शेठ भगवान मुरुमकरने मागीतलेले पैसे दिले नाहीत अजुन, असे म्हणुन त्या तिघांनी वडीलांना शिवीगाळ केली.दम दिला की, भगवान मुरुमकरच्या नादी लागु नका त्यांच्या सांगण्यावरुन आम्ही लोक तुमचा जीव घ्यायला पण मागे पुढे बघणार नाही , गुपचुप मागीतलेले पैसे द्या, नाहीतर परिणाम वाईट होतील, तुम्हाला तुमच्या गांडीत लय मस्ती आली आहे, मला भगवान मुरुमकरचा आदेश येऊ दे फक्त, बघतो तुमच्याकडे,असे सांगुन तेथील इसम निघुन गेले. सदर झालेली घटनेची माहिती वडील उमाकांत यांनी मला दिली होती.

तसेच 26 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 4/15 वा. सुमारास स्वतः भगवान मुरुमकर हे आमच्या मे. रावसाहेब बाबुराव अंदुरे भांड्याचे दुकान शाखा नं. 1 जून्या बस स्टँण्ड समोरील दुकानात आले. माझे चुलते शशिकांत अंदुरे यांना बोलले की, तुमच्या भावाला व तुम्हाला सांगितलेले काही कळत नाही, तुमच्या गांडीत लई माज आहे.पैशासाठी कशाला घरातील लोकांचा जीव गमावताय, गुपचुप पैसे द्या, माझ्या एका आदेशावर माझे गुंड पोरं तुम्हाला मारहाण करतील, तुमचा जीव घेतील, उगाचच माझ्याशी वाईट होऊ नका, महागात पडेल, असे सांगुन ते तेथून निघुन गेले. जाता-जाता ते बोलले की, यांची वाच्यता बाहेर कोणाला करु नका, नाहीतर वाईट परिणाम होतील असे सांगुन ते निघुन गेले.

15 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 3/18 वा. सुमारास वडील उमाकांत हे आमच्या नगर रोड साई पेट्रोलपंपा मागील आमच्या गोडावून मध्ये बसलेले असताना भगवान मुरुमकर, भरत जगदाळे, विक्रम डाडर, सोनु वाघमारे व इतर दोन ते तीन इसम हे भगवान मुरुमकर यांच्या गाडीमधुन उतरून गोडावूनमध्ये आले. त्यांनी अर्धा इंची लोखंडी पाईप आम्हाला तीन फुट या प्रमाणे सहा ते सात तुकडे करुन द्या, अशी मागणी केली. म्हणून वडीलांनी ग्राहक समजुन पाईपाचे तुकडे करुन द्यायला सांगितले. त्यानंतर आलेल्या सर्वांनी लोखंडी पाईपचे तुकडे हातामध्ये घेतले व वडीलांकडे ते दाखवत म्हणाले, जर वेळेवर पैसे दिले नाहीत तर, हेच पाईप तुमच्या गांडीत घालुन तुम्हाला खल्लास करुन टाकेल. लवकरात लवकर पैसे द्या. अशी धमकी दिली असल्याचे वडीलांनी मला सांगितले होते.

23 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 8/30 वा चे सुमारास माझे वडील उमाकांत अंदुरे हे आमचे मे. रावसाहेब बाबुराव अंदुरे भांड्याचे दुकान शाखा नं. 1 जून्या बस स्टॅण्ड समोरील दुकानातून रोडच्या पलीकडे असलेल्या चहाच्या टपरीवर गेले असता तेथे भरत जगदाळे याने त्यांना बोलावले व वडीलांना म्हणाला की, तुमची दिलेली मुदत आज संपली. पैसे आम्हाला देणार आहात की नाही. त्यावर वडील उमाकांत त्यांना म्हणाले की, आम्ही पैसे देवु शकत नाही, असे म्हणताच भरत जगदाळे यांनी वडीलांना मारहाण करण्यास चालु केले. त्यांचेसोबत सागर डिसले, अमोल आजबे दोघे रा. जामखेड ता. जामखेड हेही वडीलांना मारु लागले व म्हणाले की, सभापतीने सांगुन पण तुम्ही पैसे देत नाहीत काय ? आता खल्लासच करतो, असे ते बोलत मारहाण करु लागले.

त्यांनी वडीलांच्या डोक्यात हातात दगड धरून मारहाण केली.त्यांना खाली पाडले. त्यांना लाथा मारु लागले. नंतर तिघांनीही त्यांच्या हातात मोठी फरशी घेवून त्यांच्या छातीवर मारली. हे बघून माझे चुलते शशिकांत तेथे धावुन गेले. भांडणे सोडवीत असताना वरील तिघांनी त्यांच्यापण डोक्यात हातात वीट धरून मारहाण केली. त्यांनाही खाली पाडले. त्यानंतर मी तेथे जाऊन भांडण सोडवायचा प्रयत्न केला असता, त्या तिघांनी मला पण लाथाबुक्क्याने व दगडाने मारहाण केली व बोलले की, भगवान मुरुमकरने मागीतलेले पैसे देत नाही का ? आता खल्लासच करतो. असे म्हणून धमकी दिली. ते आम्हाला म्हणाले की, तुम्ही जर पोलीस कंम्प्लेंट केली तर आम्ही तुमचे दुकान फोडुन टाकु, दुकानातील सेल्समन यांना मारहाण करु, असे म्हणून ते तेथून निघून गेले.

भरत जगदाळे, सागर डिसले, अमोल आजबे सर्व रा. जामखेड ता. जामखेड यांनी केलेल्या मारहाणीत माझे वडील उमाकांत अंदुरे व चुलते शशिकांत अंदूरे यांच्या डोक्याला दुखापत होवून ते जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्या छातीत व अंगावर मारहाण झाल्याने आम्ही पोलिस स्टेशनला येवून दवाखाना मेमो घेवून त्यांना पुढील उपचार कामी नगर येथील हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान सागर अंदुरे यांच्या फिर्यादीवरून पंचायत समितीचे माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर रा. साकत ता. जामखेड, भरत जगदाळे रा. जामखेड, विक्रम डाडर रा. जामखेड, सोनु वाघमारे रा. जामखेड, सागर डिसले रा. जामखेड, अमोल आजबे रा. जामखेड व इतर दोन इसम अश्या आठ जणांविरोधात कलम 387 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.