जामखेड : प्रेम, शारीरिक संबंध, फसवणूक आणि बेवफाईचा धक्कादायक प्रकार उघड, खर्ड्यात नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ती फटाक्याच्या कारखान्यात कामावर जायची.. तीची एका ड्रायव्हरशी कारखान्यात ओळख झाली.. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.. लग्नाचे अमिष दाखवलं.. शारीरिक संबंध…कधी खर्ड्याच्या तर कधी पखरूडच्या जंगलात…ती गरोदर झाली..त्यातून तिने मुलीला जन्म दिला.. लग्नाचा आणि दोघांच्या जबाबदारीचा विषय तिने काढला..पण मजनू बेवफा निघाला आणि तीची फसवणूक झाली. ही कहाणी आहे.. खर्डा भागातील… खर्ड्यात नेमकं काय घडलं ? पाहुयात सविस्तर (Kharda jamkhed news)

याबाबत सविस्तर असे की, धाराशिव जिल्ह्यातील पखरूड (भूम) येथील दलित (मातंग) समाजातील एक २६ वर्षीय तरूणी जुलै 2024 पासून जामखेड तालुक्यातील खर्डा येथील फटाक्याच्या कारखान्यावर मोलमजुरीच्या कामाला जात होती. त्याचवेळी तिची कारखान्यातील ड्रायव्हर नाना श्रीहरी भोसले (रा. मुंगेवाडी, ता. जामखेड) याच्याशी ओळख झाली. नंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आपण अविवाहित आहोत असे भोसले याने तरूणीला सांगितले होते. तिच्याशी गोड बोलून तो तिच्याकडे वारंवार शारीरिक संबंधाची मागणी करायचा पण ती त्याला नकार द्यायची.
पण, जुलै २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात नाना भोसले याने लग्नाचे आमिष दाखवून तिला खर्डा गावाजवळील जंगलात नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपीने पखरुड (ता. भुम, जि. धाराशिव) येथे वेळोवेळी फिर्यादीसोबत शारीरिक संबंध ठेवले त्यामुळे ती गर्भवती राहिली होती. ५ एप्रिल २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयात तीची डिलेव्हरी झाली. त्यावेळी तिने एका मुलीला जन्म दिला. मुलगी झाल्यावर आरोपीने फिर्यादी व तिच्या मुलीची जबाबदारी घेण्यास नकार दिला.
दलित (मातंग) समाजातील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी नाना श्रीहरी भोसले यांच्याविरोधात खर्डा पोलिस स्टेशनला अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमासह भारतीय न्याय संहिता (बी.एन एस) 2023 : 64 (2) M व 69 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास अधिकारी प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्वलसिंग राजपूत करत आहेत.