यंदा जनसेवा ग्रामविकास पॅनल प्रचंड बहुमताने विजयी होणार – पॅनल प्रमुख सुभाष तात्या काळदाते यांचा दावा, राजुरीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। राज्यात आणि देशात भाजपची सत्ता आहे, याच सत्तेचा उपयोग राजुरी, डोळेवाडी, घुलेवस्ती, एकबुर्जी आणि बांगरमळा या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी करायचा आहे, आमदार राम शिंदे साहेबांच्या माध्यमांतून राजुरीचा कायापालट करायचा आहे. राजुरीतील सुज्ञ जनता नेहमी सत्तेच्या आणि विकासाच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहत आली आहे, यंदाच्या निवडणुकीत जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या पाठीशी जनता बहुमताने उभी राहणार यात तिळमात्र शंका नाही, त्यामुळे यंदा आमच्या पॅनलचा विजय निश्चित आहे, असा विश्वास माजी सरपंच तथा जनसेवा ग्रामविकास पॅनलचे प्रमुख सुभाष तात्या काळदाते यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी व्यक्त केला.
जामखेड तालुक्याच्या राजकारणात महत्वपूर्ण असलेल्या राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज 16 डिसेंबर 2022 रोजी थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या नेत्यांनी घरोघरी जात मतदारांशी संवाद साधला. या पॅनलने प्रचाराचा नारळ फोडताना गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडणारे शक्तिप्रदर्शन केले होते. त्यात मतदारांनी जनसेवा ग्रामविकास पॅनलला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता.प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत जनसेवा ग्रामविकास पॅनलने जनतेची मने जिंकली. प्रचार काळात जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. आपली भूमिका पटवून देण्यात जनसेवा ग्रामविकासचे सर्व उमेदवार यशस्वी ठरत असल्याचे संपूर्ण प्रचार काळात दिसून आले.
RPL ची ताकद जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या पाठिशी
दरम्यान, राजुरी डोळेवाडी, घुलेवस्ती, एकबुर्जी आणि बांगरमळा या परिसरात नेहमी सामाजिक कामात अग्रेसर राहून गोरगरीब जनतेची गेल्या काही वर्षांपासून सेवा करत असलेल्या आरपीएल (RPL) ग्रुपच्या 180 पेक्षा तरूण कार्यकर्त्यांची ताकद जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या पाठिशी एकवटली होती, जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली RPL चे तरूण कार्यकर्ते प्रचारात मोठी मेहनत घेत असल्याचे दिसून आले.
जनता कोणाच्याही दबावाला, दडपशाही बळी पडणार नाही,
शांत, संयमी, विकासाभिमूख आणि दूरदृष्टी असलेले जेष्ठ नेते सुभाष तात्या काळदाते हेच खऱ्या अर्थाने गावचा चेहरा मोहरा बदलू शकतात, विकासाची गंगा गावात आणू शकतात, असा विश्वास तरूणांसह जनतेला आहे, त्यामुळे यंदा जनसेवा ग्रामविकास पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, जनता कोणाच्याही दबावाला, दडपशाही बळी पडणार नाही, जनतेला गावात शांतता हवी आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व हवं आहे, त्यामुळे जनता आमचे नेते सुभाष तात्या काळदाते यांच्या पाठिशी एकवटली आहे, जनता कुठल्याही प्रलोभनाला, आमिषाला बळी पडणार नाही, जनता विकासासाठी आम्हाला मोठ्या फरकाने विजयी करणार आहे, असा विश्वास दादासाहेब खाडे, सागर फुंदे आणि गणेश काळदाते यांनी प्रचाराची सांगता करताना व्यक्त केला.
आमदार राम शिंदे साहेबांच्या माध्यमांतून विकासाची गंगा गावात आणणार
यावेळी बोलताना जनसेवा ग्रामविकासचे पॅनल प्रमुख सुभाष तात्या काळदाते म्हणाले की, राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत जनसेवा ग्रामविकास पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहेत, निवडणूक काळात आम्ही जो जाहीरनामा जनतेसमोर मांडला आहे,तो नुसता जाहीरनामा नसुन तो आमचा वचननामा आहे. जनतेने सुचवलेली सर्व कामे त्यात आहेत, ती सर्व कामे आमचे नेते आमदार राम शिंदे साहेबांच्या माध्यमांतून आम्ही पुढील पाच वर्षांत पुर्ण करणार आहोत, आम्ही मागील काळात जेव्हा सत्तेवर होतो, त्या काळात सुध्दा आम्ही भरीव विकास कामे केली आहेत, आता यंदा पुन्हा जनता आम्हाला गावाची सेवा करण्याची संधी देणार आहे, कारण, या संधीचे आम्ही सोने करून दाखवू, असा जनतेला विश्वास आहे. जनतेच्या याच विश्वासाला कधीच तडा जाऊ दिला जाणार नाही, यंदा सरपंचपदाच्या उमेदवारासह आमच्या संपुर्ण पॅनलला जनता प्रचंड बहूमताने विजयी करेल, असा विश्वास पॅनल प्रमुख सुभाष तात्या काळदाते यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ‘जामखेड टाइम्स’शी बोलताना व्यक्त केला.