विद्यार्थ्यांनी योगासनांना जीवनाचा एक अविभाज्य घटक बनवावे – डॉ. दत्तात्रय सोनवणे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : संयुक्त राष्ट्रांनी मानवजातीच्या सुदृढ आरोग्यासाठी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. संपूर्ण जगाला योगाने निरोगी बनवण्याची कल्पना यावर्षी ‘एक स्वास्थ्य, एक पृथ्वीसाठी योग’ या संकल्पनेतून मांडण्यात आली आहे. निरोगी आरोग्य व मानसिक शांतीसाठी, विद्यार्थ्यांनी योगासने एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता त्यांना आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनवावे असे प्रतिपादन सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे यांनी केले. 

Students should make yoga asanas an integral part of life - Dr. Dattatraya Sonawane

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय, हाळगाव येथे ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिम्मित राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत ‘योग कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थी दशेत शारीरिक सुदृढता व मानसिक एकाग्रता वाढावी हा मुख्य उद्देश या कार्यशाळेच्या आयोजनामध्ये होता. या कार्यशाळेत योग प्रशिक्षिका अर्चना महाजन, डॉ. निकिता धाडगे, डॉ. प्रणाली ठाकरे, डॉ. महेश निकम, डॉ. धनंजय पाटील, महादू शिंदे, प्रदीप धारेकर, सुरेश माकरे, शशिकांत कांबळे उपस्थित होते. 

Students should make yoga asanas an integral part of life - Dr. Dattatraya Sonawane

योग प्रशिक्षिका अर्चना महाजन यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे प्राचीन काळापासून असणारे महत्व, त्यांचा इतिहास व विविध प्रकार यांची माहिती दिली. प्रात्यक्षिकाद्वारे प्राणायमाचे विविध प्रकार व योगासने विद्यार्थ्यांसमोर सादर केली. सदर कार्यशाळेत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.

Students should make yoga asanas an integral part of life - Dr. Dattatraya Sonawane