जामखेड शहरात ‘यशराज एंटरप्रायजेस’ च्या ऑफिसचा थाटामाटात शुभारंभ, उद्योजक जालिंदर चव्हाण व उद्योजक प्रल्हाद डिसलेसर या दोघांच्या आई-वडिलांच्या हस्ते भव्य उद्घाटन संपन्न
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहराच्या व्यावसायिक क्षेत्रात रविवारी एक नवा अध्याय लिहीला गेला. बोर्ला येथील उद्योजक जालिंदर चव्हाण व डिसलेवाडी येथील उद्योजक प्रल्हाद डिसले सर या दोघा तरुण उद्योजकांनी एकत्रितपणे आपल्या व्यवसायाचा विस्तार साधत ‘यशराज एंटरप्रायजेस’ या फर्मच्या नुतन कार्यालयाची जामखेड शहरात मुहूर्तमेढ रोवली.चव्हाण व डिसले यांनी मोठ्या कष्टातून व्यावसायिक क्षेत्रात घेतलेली भरारी तालुक्यातील नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

रविवार, दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी नगर रोडवरील जे.पी. कॉम्प्लेक्स येथे यशराज एंटरप्रायजेस या ऑफीसचे उद्घाटन ताराबाई दत्तात्रय चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, जयश्री डिसले, बिरू डिसले यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटामाटात पार पडले. दोन्ही उद्योजकांच्या आई वडिलांच्या हस्ते पार पडलेल्या या मंगलमय सोहळ्याने उपस्थित सर्वांच्याच मनात समाधान व अभिमानाची भावना यावेळी दाटून आली होती. या उद्घाटन समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पक्षांचे नेते व्यावसायिक, नातेवाईक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचा उद्योजक जालिंदर चव्हाण व उद्योजक प्रल्हाद डिसले सर यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. यशराज एंटरप्रायजेसच्या भव्य उद्घाटन समारंभामुळे जामखेड शहराच्या व्यावसायिक क्षेत्रात रविवारी नवा इतिहास रचला गेला.उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागातून पुढे आलेल्या उद्योजकांचे अभिनंदन करत यशराज एंटरप्रायजेसच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जामखेड शहरात यशराज एंटरप्रायजेसचे उद्घाटन झाले, तेव्हा सर्वांचे लक्ष आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे या दोन तरुण उद्योजकांच्या यशामागील प्रेरणास्थान – त्यांचे आई-वडील व कुटुंबातील सदस्य हे होते. बोर्ल्यासारख्या छोट्याशा खेड्यातून पुढे आलेले जालिंदर चव्हाण व डिसलेवाडीतील प्रल्हाद डिसले सर हे दोघेही आपल्या व्यवसायात प्रगती करून आज समाजात एक आदर्श निर्माण करत आहेत.त्यांच्या या यशाचा पाया त्यांच्या आई-वडिलांच्या कष्ट, त्याग आणि प्रोत्साहनात आहे.

दोघांच्या आईने आयुष्यभर घरची जबाबदारी सांभाळली, अनेक संकटांना हसत-हसत तोंड दिले. त्यांच्या प्रेमळ साथीतून मुलांमध्ये कष्ट करण्याची जिद्द व ध्येय गाठण्याची प्रेरणा रुजली. वडिलांनी आपल्या घामाच्या थेंबातून संसार उभा करताना मुलांना सतत प्रोत्साहन दिले. “आपण छोट्या गावात जन्मलो म्हणजे स्वप्नं लहान असावीत असं नाही,” हा आत्मविश्वास त्यांनी आपल्या मुलांमध्ये जागवला आणि त्यांच्या मुलांनी तो खरा करून दाखवला. मोठ्या कष्टातून त्यांनी आपल्या व्यवसायात भरारी घेतली.

आज हे उद्योजक जेवढे यशस्वी झालेत, तेवढ्याच अभिमानाने त्यांच्या आई-वडीलांचा त्याग व संघर्षही उजळून निघत आहे. यशराज एंटरप्रायजेसचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणे म्हणजे त्यांच्या त्यागाला मिळालेला सन्मान व आशीर्वादाचे फलितच होय. या दोन तरुण उद्योजकांच्या कर्तृत्वामागे उभे असलेले त्यांचे आई-वडील तसेच कुटुंबातील इतर सर्व सदस्य या यशाचे खरे नायक आहेत. त्यांच्या कष्ट व आशीर्वादामुळेच जालिंदर चव्हाण व प्रल्हाद डिसले आज व्यवसायाच्या नव्या उंचीवर पोहोचले आहेत, अशी भावना यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.

यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते प्रा मधुकर आबा राळेभात, मार्केटचे सभापती शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर, भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, शहर तालुकाध्यक्ष संजय काशिद, भाजपा नेते पांडुरंग उबाळे, माजी नगराध्यक्ष विकास (तात्या) राळेभात, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, मार्केटचे संचालक सचिन घुमरे, डाॅ गणेश जगताप, सभापती प्रा.राम शिंदे यांचे भाचे तथा युवा उद्योजक शिवाजी भांड, सभापती प्रा.राम शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अजय सातव, उद्योजक श्रीकांत कर्डिले, उद्योजक संजय कार्ले.

उद्योजक हवा सरनोबत, नान्नजचे सरपंच महेंद्र मोहळकर, युवा नेते उदयसिंह पवार, डाॅ राळेभात, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, आत्माराम चव्हाण, सरपंच सागर कोल्हे, राष्ट्रवादीचे युवा नेते शरद शिंदे, नरेंद्र जाधव, उमरभाई कुरेशी, जेष्ठ नेते भारत काकडे, अशोक महारनवर, खांडवीचे सरपंच मनेष भोसले, मच्छिंद्र पोकळे, कांतीलाल वराट, भानुदास पवार, प्रा संजय राऊत, विशाल भांडवलकर, मोहन गडदे, राहुल चोरगे, सरपंच दिलीप काकडे,कृष्णराजे चव्हाण, राजेंद्र चव्हाण,गणेश लटके, जयसिंग पवार,अशोकराव गायकवाड, दयानंद भांडवलकर, किरण जाधव, अशोक खाडे, कसाब सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.