जामखेड टाइम्स वृत्तसेवा : चोंडी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या नवनिर्वाचित चेअरमन वच्छला सुभाष भांडवलकर व व्हाईस चेअरमन बाबुराव शिंदे यांनी सर्व संचालकांच्या उपस्थितीमध्ये आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. हा पदग्रहण सोहळा आज १५ ऑक्टोबर रोजी पार पडला.

पदभार स्विकारण्यापुर्वी सर्व संचालकांनी विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांची भेट घेतली. यावेळी प्रा राम शिंदे यांनी नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालकांचा आपल्या निवासस्थानी यथोचित सन्मान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा. त्यानंतर नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी आपल्या पदाचा पदभार सोसायटीत जाऊन स्वीकारला.

चोंडी सेवा संस्थेवर प्रा राम शिंदे यांची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे. या संस्थेच्या चेअरमनपदी वच्छला सुभाष भांडवलकर व व्हाईस चेअरमनपदी बाबुराव शिंदे यांची ६ ऑक्टोबर रोजी बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यानंतर या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्विकारला.

यावेळी मिलिंद देवकर तुकाराम उदमले, अनिल शिंदे, अशोक भगत, संदिप शेळके, सोसायटीचे सचिव सुरेश लेकुरवाळे, उद्योजक विशाल शिंदे, युवा नेते दिनेश शिंदे, युवा नेते विशाल भांडवलकर, प्रा राम शिंदे यांचे स्वीय सहायक संतोष कुरडुले, विशाल शिंदे,आण्णा भांडवलकर,पिंटु भांडवलकर, बुवासाहेब भांडवलकर,परसु उबाळे, अशोक शिंदे,आनंद शिंदे,कैलास महादेव शिंदेसह चोंडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
