जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत येत असलेल्या जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या ग्रंथालयाचे उदघाटन यावेळी करण्यात आले. या ग्रंथालयामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी सुविधा निर्माण झाली आहे. सुसज्ज ग्रंथालयाचे उदघाटन डॉ. ससाणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय सोनवणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे, ग्रंथालय प्रभारी अधिकारी प्रा. पोपट पवार, इतर प्राध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी व सुरक्षा रक्षक उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहाय्यक प्राध्यापक शारीरिक शिक्षण डॉ. राहुल विधाते यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
