जामखेड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग, आता नाही तर कधीच नाही या भूमिकेतून इच्छुकांकडून चाचपणी सुरू !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची प्रारूप प्रभाग रचना नुकतीच जाहीर केली आहे. त्यानंतर जामखेड तालुक्यात राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे.सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांनी जोरात चाचपणी हाती घेतली आहे.

प्रारूप प्रभाग रचनेमध्ये जामखेड तालुक्यात एकूण ३ जि.प. गट व ६ पं.स. गण असे सीमांकन करण्यात आले आहे. या नव्या रचनेनुसार काही ग्रामपंचायतींचा समावेश वेगवेगळ्या गटांमध्ये करण्यात आला आहे.यामुळे राजकीय समीकरणेही बदलली आहेत.निवडणूक आयोगाने ही रचना जाहीर करताच संबंधित गण आणि गटांमध्ये इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी सुरू केली असून गावपातळीवर संपर्क मोहिमा, बैठकांना गती दिली आहे.
जामखेड तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्याच गटात (भाजप विरूध्द राष्ट्रवादी(SP)) थेट सामना रंगताना दिसणार आहे. परंतू या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस (AP), काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट व ठाकरे गट), तसेच स्थानिक अपक्ष उमेदवार रंग भरताना दिसू शकतात. त्यादृष्टीनेच त्यांनीही तयारी हाती घेतली आहे. महायुती व महाविकास असा थेट सामना होणार का ? की सगळेच पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरणार यावरही अनेक इच्छुकांचे नशीब अवलंबून असणार आहे.
प्रारूप प्रभाग रचनेनंतर अनेक इच्छुकांनी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.युवक वर्ग देखील यावेळी अधिक सक्रिय झाल्याचे चित्र आहे. काही नवखे चेहरे सोशल मीडियाचा वापर करून जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.राजकीय विश्लेषकांच्या मते, या नव्या प्रारूपामुळे आगामी निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी जुन्या नेत्यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात उमेदवारी मिळणे कठीण जाणार आहे. काही गटातून नव्या दमाच्या अभ्यासू कार्यकर्त्यांना लाॅटरी लागू शकते.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीस अद्याप काही महिने बाकी असले तरी, राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. प्रत्येक गटात आणि गणात इच्छुकांची संख्या मोठी आहे. कोणाला कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळणार ? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
प्राथमिक पातळीवर तयारीला लागलेल्या उमेदवारांसाठी ही निवडणूक अतिशय अतितटीची राहणार आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवार ‘आता नाही तर कधीच नाही’ याच भूमिकेतून निवडणूकीच्या तयारीला लागला आहे. यामुळे यंदाची निवडणूक गाजणार आहे.
सध्या जाहीर झालेली प्रारूप प्रभाग रचना अंतिम नाही. त्यावर आलेल्या हरकती, सूचना व चर्चेनंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. मात्र संभाव्य गट व गण लक्षात घेता स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अगामी काळात जनतेशी संपर्क वाढवण्याचे, स्थानिक समस्यांवर भाष्य करण्याचे, तसेच सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली प्रतिमा उभारण्याचे प्रयत्न इच्छुक उमेदवार करताना दिसणार आहेत. पुढील काही महिन्यांत ही चुरस अधिक रंगतदार होईल, यात शंका नाही.
जामखेड तालुक्यात जिल्हा परिषद गट किती ?
1) साकत
2) खर्डा
3) जवळा
जामखेड तालुक्यात पंचायत समिती गण किती ?
1) शिऊर
2) साकत
3) खर्डा
4) नान्नज
5) अरणगाव
6) जवळा
शिऊर पंचायत समिती गणातील गावांची नावे
1) मोहा
2) सावरगाव
3) राजुरी
4) डोळेवाडी
5) शिऊर
6) घोडेगाव
7) झिक्री
8) धोंडपारगाव
9) सारोळा
10) काळेवाडी
11) पाडळी
12) खुरदैठण
साकत पंचायत समिती गणातील गावांची नावे
1) साकत
2) कोल्हेवाडी
3) पिंपळवाडी
4) देवदैठण
5) नाहूली
6) नायगाव
7) जायभायवाडी
8) बांधखडक
9) तेलंगशी
10) आनंदवाडी
11) पिंपळगाव आळवा
12) धामणगाव
खर्डा पंचायत समिती गणातील गावांची नावे
1) खर्डा
2) नागोबाचीवाडी
3) मुंगेवाडी
4) पांढरेवाडी
5) दरडवाडी
6) दिघोळ
7) माळेवाडी
8) मोहरी
9) जातेगाव
10) लोणी
11) बाळगव्हाण
नान्नज पंचायत समिती गणातील गावांची नावे
1) नान्नज
2) आपटी
3) वाकी
4) सातेफळ
5) पिंपळगाव उंडा
6) तरडगाव
7) वंजारवाडी
8) दौंडाचीवाडी
9) सोनेगाव
10) धनेगाव
11) जवळके
12) राजेवाडी
13) महारूळी
14) गुरेवाडी
15) पोतेवाडी
16) वाघा
अरणगाव पंचायत समिती गणातील गावांची नावे
1) डोणगाव
2) अरणगाव
3) पारेवाडी
4) फक्राबाद
5) पाटोदा
6) खामगाव
7) भवरवाडी
8) धानोरा
9) वंजारवाडी
10) रत्नापुर
11) सांगवी
12) कुसडगाव
13) सरदवाडी
14) खांडवी
15) डिसलेवाडी
जवळा पंचायत समिती गणातील गावांची नावे
1) मुंजेवाडी
2) चोभेवाडी
3) बोर्ले
4) चोंडी
5) आघी
6) जवळा
7) कवडगाव
8) गिरवली
9) पिंपरखेड
10) हसनाबाद
11) बावी
12) हळगाव