jilha Parishad Panchayat samiti Nivadnuk 2025-26 : राज्यात दिवाळीनंतर निवडणूक धमाका, इच्छूकांची हाती उरले अवघे तीन महिने, निवडणूक आयुक्त नेमकं काय म्हणाले ?
जामखेड टाइम्स वृत्तसेवा | ७ ऑगस्ट २०२५ | jilha Parishad Panchayat samiti Nivadnuk 2025-26 : राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (local body Election 2025 maharashtra) तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. दिवाळीनंतर महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद (zp election 2025) व पंचायत समिती (panchayat samiti nivadnuk 2025) निवडणुकांचा ‘धमाका’ होणार आहे. सर्वपक्षीय इच्छुकांसाठी ही निवडणूक अत्यंत निर्णायक ठरणार असून निवडणूक तयारीसाठी त्यांच्याकडे अवघे तीन महिने उरले आहेत. (zp election 2025 maharashtra)

निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची घोषणा: जानेवारी २०२६ पर्यंत प्रक्रिया पूर्ण
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे (State Election Commissioner Dinesh Waghmare) यांनी नुकताच नाशिक (nashik) विभागीय दौरा करून पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी सांगितले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चार महिन्यांत निवडणुका घेणे बंधनकारक असून आयोग त्या दिशेने काम करत आहे.”
- दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस प्रारंभ
- टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात प्रक्रिया
- जानेवारी २०२६ च्या मध्यापर्यंत पूर्णता
ओबीसी आरक्षण आणि नवी प्रभागरचना
नवीन प्रभाग व गट-गण रचना करताना २०११ च्या जनगणनेनुसार एससी, एसटी आरक्षण निश्चित केले जाईल, तर ओबीसी आरक्षण हे लॉटरी पद्धतीने रोटेशनमध्ये दिले जाईल. न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता करत ६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत संपूर्ण रचना अंतिम केली जाईल.
- निवडणूक तयारीसाठी महत्त्वाचे मुद्दे:
- मतदार यादीसाठी १ जुलै २०२५ ची यादी ग्राह्य
- विधानसभेसारखीच आचारसंहिता लागू होणार
- एक केंद्रावर सरासरी ९०० मतदार
- ईव्हीएमवर प्रत्येकी ४ वेळा मतदान
- व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाही
- आयोग ५० हजार कंट्रोल व १ लाख बॅलेट युनिट खरेदी करणार
साहित्य व यंत्रणा:
राज्यात सध्या ६२ ते ६५ हजारांच्या आसपास बॅलेट युनिट्स उपलब्ध आहेत. अतिरिक्त यंत्रांसाठी मध्य प्रदेश निवडणूक आयोगाची मदत घेतली जाईल. गरजेनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाचीही मदत घेतली जाईल. मतदार ‘ईव्हीएम’वर चारवेळेस मतदान करतील. उमेदवार संख्या जास्त असल्याने व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नसल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले. आयोगाने ५० हजार कंट्रोल व १ लाख बॅलेट युनिट खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत.
राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. राज्यात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग तसेच गट-गणाची रचना करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. ही प्रक्रिया राबविताना न्यायालयाने सोमवारी (ता.४) ओबीसी आरक्षणाबद्दल दिलेल्या आदेशानुसार प्रकिया पूर्ण केली जाईल. प्रभाग व गट-गणांच्या रचनेवेळी ओबीसी आरक्षणाची पद्धत ही रोटेशन पद्धतीने अवलंबण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका की जिल्हा परिषद आधी?
राज्यात दिवाळीनंतर साधारणत: निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. प्राथमिक टप्प्यात कोणत्या निवडणुका घेण्यात येणार याबाबत अंतिम निर्णय अद्याप नाही. पण मनुष्यबळ व साहित्याच्या आधारे टप्प्याटप्याने निवडणुका होणार आहेत, दिनेश वाघमारे म्हणाले.
जामखेड तालुक्याला राजकीय घडामोडींना वेग
जामखेड तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भेटीगाठींवर भर देत आपला चेहरा जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी इच्छुकांनी लगबग सुरु झाली आहे. नवीन प्रभागरचना, मतदार याद्या, आणि ओबीसी आरक्षण यामुळे राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारणात चुरस वाढणार आहे.