Tata च्या SUV ची धमाकेदार एंट्री, Harrier आणि Safari Adventure X भारतात लॉन्च; किंमत ₹18.99 लाखापासून पुढे | फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि संपूर्ण माहिती

मुंबई । टाटा मोटर्सने (Tata Motors) त्यांच्या पॉप्युलर SUV लाइनअपमध्ये मोठा धमाका करत Harrier आणि Safari च्या नवीन ‘Adventure X Persona’ लॉन्च केली आहे. दमदार लुक, भरपूर फीचर्स आणि जबरदस्त परफॉर्मन्ससह आलेल्या या नव्या व्हर्जनची किंमत ₹18.99 लाख (Harrier Adventure X साठी) आणि ₹19.99 लाख (Safari Adventure X+ साठी) ठेवण्यात आली आहे.

Tata's SUV make a splash, Tata Harrier and Safari Adventure X launched in India, Prices start from ₹18.99 lakh, Features, specifications and complete information,

Tata Motors ने आपल्या पॉप्युलर SUV लाइनअपमध्ये धमाकेदार भर घालत Harrier आणि Safari Adventure X Persona आज लॉन्च केली आहे. दमदार फीचर्स, शानदार डिझाईन आणि अफाट परफॉर्मन्ससह आलेल्या या गाड्या SUV प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहेत.

Tata's SUV make a splash, Tata Harrier and Safari Adventure X launched in India, Prices start from ₹18.99 lakh, Features, specifications and complete information,

‘Adventure X’ मध्ये काय खास आहे ?

Tata Motors च्या म्हणण्यानुसार, नवीन Adventure X Persona ही एक फुल-पॅक्ड ऑफर आहे – म्हणजेच ऍडव्हेंचर, स्टायलिश डिझाईन आणि बऱ्याच प्रीमियम फीचर्सचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.

Adventure X Persona मध्ये कोणते फिचर्स उपलब्ध ?

  1. ADAS सिस्टीमसह Adaptive Cruise Control (AT)
  2. 360° HD कॅमेरा व्ह्यू
  3. ट्रेल होल्ड EPB विथ ऑटो होल्ड (Trail Hold EPB विथ Auto Hold)
  4. ट्रेल रिस्पॉन्स मोड्स – सामान्य, खडबडीत, ओले (Trail Response Modes – Normal, Rough, Wet)
  5. लँड रोव्हर बेस्ट कमांड शिफ्टर (AT) (Land Rover बेस्ड Command Shifter (AT))
  6. २६.०३ सेमी अल्ट्रा-व्ह्यू ट्विन स्क्रीन सिस्टम (26.03cm Ultra-View Twin Screen System)
  7. एर्गो लक्स ड्रायव्हर सीट विथ मेमरी आणि वेलकम फंक्शन (Ergo Lux Driver Seat विथ मेमरी & Welcome फंक्शन)
  8. ट्रेल सेन्स ऑटो हेडलॅम्प्स (Trail Sense Auto Headlamps)
  9. अ‍ॅक्वा सेन्स वायपर्स (Aqua Sense Wipers)
  10. मल्टी ड्राइव्ह मोड्स – सिटी, स्पोर्ट, इको (Multi Drive Modes – City, Sport, Eco)

किंमत किती आणि कोणते व्हेरिएंट?

Tata Harrier :

Smart – ₹14,99,990
Pure X – ₹17,99,000
Adventure X – ₹18,99,000
Adventure X+ – ₹19,34,000
Fearless X – ₹22,34,000
Fearless X+ – ₹24,44,000

Tata Safari:

Smart – ₹15,49,990
Pure X – ₹18,49,000
Adventure X+ – ₹19,99,000
Accomplished X – ₹23,09,000
Accomplished X+ (7s) – ₹25,09,000
Accomplished X+ (6s) – ₹25,19,000

“Adventure X म्हणजे SUV चा रियल किंग” – विवेक श्रीवास्ता (Vivek Srivats

टाटा मोटर्सचे CCO विवेक श्रीवास्ता (Vivek Srivatsa) म्हणाले की, “Harrier आणि Safari या गाड्या स्टेटस, ऍडव्हेंचर आणि स्टाईल यांचं प्रतीक आहेत. Adventure X Persona मुळे या गाड्यांना नव्या युगाची स्टाइल आणि स्मार्टनेस मिळाला आहे.आम्ही या गाड्यांना अधिक वैल्यू, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी दिली आहे.Adventure X म्हणजे SUV चा रियल किंग आहे असे ते म्हणाले “

रफ रोड्ससाठी बनवलेलं मस्त मशीन

Adventure X Persona ही Land Rover च्या D8 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे आणि यात आहे दमदार 2.0L KRYOTEC डिझेल इंजिन. यामुळे performance आणि reliability दोन्हींची खात्री

  • Harrier मध्ये मिळतात R17 Titan Forged Alloys
  • Safari मध्ये R18 Apex Forged Alloys
  • दोघांमध्येही वेगवेगळ्या mascot डिझाइन्स – जे त्यांचा ब्रँड आणि heritage दाखवतात.

Interior मध्ये काय?

  • Harrier – रग्गड आणि क्लासी Onyx Trail लुक विथ ब्लॅक लेदर सीट्स + टॅन टच
  • Safari – रिच Tan Oak इंटिरियर्स, एकदम प्रीमियम फील

आता निवडा तुमच्यासाठी परफेक्ट SUV

Adventure X च्या लॉन्च सोबतच Tata Motors ने Harrier आणि Safari चा संपूर्ण पोर्टफोलिओ रिफ्रेश केलाय.
आता आणखी स्मार्ट व्हेरिएंट्स, नव्या रंगात आणि अधिक फिचर्ससह SUV खरेदी करणं सोपं आणि स्मार्ट बनणार आहे.

जर तुम्हाला एकदम मस्त, दमदार आणि स्मार्ट SUV घ्यायची असेल तर – Tata Harrier आणि Safari Adventure X Persona तुमच्यासाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. स्टाईल, दमदारपणा आणि फीचर्स, सगळं ₹18.99 लाख पासून सुरू होणाऱ्या किमतीत मिळणार आहे. इतक्या फीचर्स असलेली SUV Harrier आणि Safari चा Adventure X अवतार मिस करू नका.