Shubman Gill Record : इंग्लंड कसोटीत शुभमन गिलने मोडला Virat kohali चा रेकॉर्ड, आता पुढचा नंबर 54 वर्षांपुर्वीच्या Sunil Gavaskar यांच्या ऐतिहासिक विक्रमाचा !
Shubman Gill Record : भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडत नवा इतिहास घडवला. चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी गिलने नाबाद 78 धावांची दमदार खेळी करत भारताला दोन बाद शुन्य या धोकादायक स्थितीतून सावरलं. त्याला सलामीवीर फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) भक्कम साथ देत 87 धावांची नाबाद खेळी केली. तिसऱ्या विकेटसाठी महत्वाची भागीदारी रचली. (Most Run In A Test Series)

इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय कर्णधार शुभमन गिलने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. कसोटी मालिकेत भारतीय कर्णधाराकडून सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. किंग कोहलीने 2016 साली इंग्लंडविरुद्ध पाच कसोटीत 655 धावा केल्या होत्या. पण गिलने मँचेस्टर कसोटीच्या चौथ्या दिवशीच हा विक्रम मोडून 685 धावांवर मजल मारली. (Shubman Gill Record)
गिलने मालिकेत आतापर्यंत तीन शतकं झळकावली आहेत दुसऱ्या कसोटीत एजबॅस्टन येथे त्याने 269 धावांची महाकाय खेळी उभारली होती, ज्यामुळे भारताने 336 धावांनी मोठा विजय मिळवला होता. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला “कसोटी कर्णधार” या भूमिकेत एका संस्मरणीय मालिकेची सुरुवात मिळाली आहे. (Shubman Gill Record test)
दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारताची धावसंख्या होती 174/2 (63 षटकांत), गिल 78 आणि राहुल 87 धावांवर नाबाद होते. सुरुवातीला 0/2 या धक्क्यातून भारताने सावरत सध्या सामना बरोबरीच्या दिशेने नेला आहे.
Shubman Gill Record : आता पुढचा नंबर Sunil Gavaskar यांच्या 54 वर्षांपुर्वीच्या ऐतिहासिक विक्रमाचा !
अर्थात, गिलला अजून एक मोठा विक्रम गाठायचा आहे. कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजाकडून सर्वाधिक धावांचा विक्रम. हा विक्रम अजूनही सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. त्यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या पदार्पणात 774 धावा केल्या होत्या. गिल सध्या 685 धावांवर आहे आणि ‘सनीजींचा विक्रम मोडण्यासाठी त्याला फक्त 90 धावांची गरज आहे. (Shubman Gill Record today)
दरम्यान, कसोटी मालिकेत सर्वाधिक धावांचा जागतिक विक्रम अजूनही ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी 1930 मध्ये अॅशेस मालिकेत तब्बल 974 धावा केल्या होत्या. गिलला हा विक्रम मोडणं कठीण असलं, तरी भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचण्याची संधी त्याच्यापुढे नक्कीच आहे. आता पाहावं लागेल की शेवटच्या दिवशी गिल हा ऐतिहासिक टप्पा गाठतो का ? भारताच्या विजयाची आणि गिलच्या विक्रमांची झलक पाचव्या दिवशी पाहायला मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.