Nitish Kumar News : देशाच्या राजकारणात पुन्हा भूकंप, बिहारमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का, नितिश कुमार भाजपसोबत पुन्हा संसार थाटणार ? लवकरच होणार घोषणा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Nitish Kumar News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकवटलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडी आता खिळखिळी होऊ लागली आहे. रोज एक भिडू त्यांना सोडून जाऊ लागला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बिहारमधून राजकीय भूकंपाची एक बातमी समोर आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे नवा संसार थाटण्याच्या मूडमध्ये आले आहेत. नितीशकुमार यांच्या या पवित्र्यामुळे इंडिया आघाडीत फुट पडल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. (Nitish Kumar bjp News )

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव व त्यांचे पुत्र तथा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी नितीशकुमार यांचे मतभेद झाल्याची चर्चा आहे. याच मतभेदांमुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे इंडिया आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत पुन्हा नवा संसार थाटण्याच्या तयारी आहेत. दिल्ली आणि पाटण्यात गेल्या दोन दिवसांपासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. (Nitish Kumar News)
नितीशकुमार भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्यांनी बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी नितीशकुमार हे भाजपसोबत जाणार असल्याचा दावा केला होता. त्यांचा हा दावा खरा ठरणार असल्याचे दिसू लागले आहे. नितीशकुमार भाजपसोबत बिहारमध्ये सरकार बनवणार असा दावा होत असला तरी जेडीयू किंवा भाजपनं या संदर्भात जाहीरपणे कोणतीही भूमिका मांडलेली नाही.(Nitish Kumar News)
पाटनामधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांडने बिहार भाजप नेत्यांना बैठकीसाठी दिल्लीला बोलावले होते. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. अमित शहा आणि जेपी नड्डा यांनी बिहारच्या भाजपच्या नेत्यांसोबत सुमारे दोन तास चर्चा झाली. या बैठकीसाठी विनोद तावडे, बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी, भीखूभाई दलसानिया, सुशीलकुार मोदी, रेणू देवी यांची उपस्थिती होती.(Nitish Kumar News)
बैठकीनंतर सम्राट चौधरी यांनी नितीशकुमार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांना टाळलं. त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं म्हटलं.2024 सभा निवडणूक कशी लढवावी, यासंदर्भात चर्चा झाल्याचं ते म्हणाले. भाजपच्या बैठकीमध्ये नितीश कुमार यांच्या मुद्द्यावर कोणतेही वादग्रस्त विधान करण्यात आलं नाही. बिहार भाजप नेत्यांसोबतची बैठक संपल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा आणि जे.पी.नड्डा यांची स्वतंत्र बैठक पार पडली.(Nitish Kumar News)
भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी आणि नितीश कुमार यांचे निकटवर्तीय नेते के.सी. त्यागी यांची पाटणा विमानतळावर भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली. त्यानंतर दोन्हीही नेते पाटणाहून दिल्लीला पोहोचले. के.सी. त्यागी यांनी दिल्लीत पोहोचताच इंडिया आघाडी भक्कम असल्याचं म्हणत जेडीयू इंडिया आघाडीचा भाग असल्याचं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांच्यात काल (25 जानेवारी ) रात्री लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत बिहारच्या राजकीय स्थितीवर आणि नितीशकुमार यांच्या भूमिकेवर चर्चा झाली.(Nitish Kumar News)
Nitish Kumar News : बिहारमध्ये नितीश कुमार भाजप सोबत युती करणार
दरम्यान, आज 26 जानेवारी रोजी सकाळपासून बिहारच्या राजकारणाबाबत एक वृत्त आले आहे, या वृत्तानुसार नितीशकुमार यांची भाजपासोबती बोलणी पुर्ण झाली आहे. येत्या दोन दिवसांत नितीशकुमार हे भाजपसोबत सरकार स्थापन करतील असे बोलले जात आहे. नव्या सरकारमध्ये नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील, तर भाजपकडे दोन उपमुख्यमंत्री पद असतील हा फाॅर्म्यूला मान्य करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अजून कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही, तूर्तास ही राजकीय चर्चा असल्याने देशाच्या राजकारणाच्या घडामोडींचे केंद्र बिहार बनले असल्याने बिहारमध्ये नेमकं काय होते याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.(Nitish Kumar News)