नागपंचमी 2025 : भारतातील ७ रहस्यमय नाग मंदिरे तुम्हाला माहिती आहेत का? सविस्तर जाणून घ्या । Nag Panchami 2025

Nag Panchami 2025 : श्रावण महिना म्हणजे देवभक्तीचा उत्सव! पावसाच्या सरींसह येणारा हा महिना शिवभक्तांसाठी विशेष असतो. याच पवित्र महिन्यात येणारी नागपंचमी ही आपली संस्कृती आणि निसर्ग यांच्यातील नातं अधोरेखित करणारी सण आहे. महाराष्ट्रात या दिवशी नागोबा देवाला दूध अर्पण करून सर्पदोषापासून मुक्तीची प्रार्थना केली जाते.नागपंचमी हे निसर्ग संवर्धनाचं प्रतीक असून आपली परंपरा सर्पासारख्या जीवांचाही सन्मान करण्याची शिकवण देते.

Nag Panchami 2025, Do you know 7 mysterious Nag temples in India? Learn in detail. Nag Panchami 2025 news in marathi,

भारतभूमीला देव-देवतांचं देश असं म्हटलं जातं. हिंदू धर्मात अनेक सण-पर्व साजरे केले जातात, जे विविध देव-देवतांशी संबंधित असतात. त्यापैकीच एक म्हणजे नागदेवता, ज्यांची पूजा नागपंचमी दिवशी केली जाते.श्रावण महिना हा भगवान शंकराचा अतिशय प्रिय महिना मानला जातो. शिवाच्या गळ्यात शोभणारा नागही त्याचं महत्वाचं रूप आहे. म्हणूनच श्रावण महिन्यात नागदेवतेची पूजा करणे ही परंपरा आहे.

Nag Panchami 2025, Do you know 7 mysterious Nag temples in India? Learn in detail. Nag Panchami 2025 news in marathi,

प्रत्येक वर्षी श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी संपूर्ण देशभरात नागदेवतेची श्रद्धा व भक्तीपूर्वक पूजा केली जाते. भारतातील अनेक नागमंदिरांमध्ये नागपंचमी दिवशी विशेष पूजन केलं जातं. देशात अशी काही मंदिरं आहेत जी दरवर्षी फक्त नागपंचमीच्याच दिवशीच उघडली जातात.

Nag Panchami 2025, Do you know 7 mysterious Nag temples in India? Learn in detail. Nag Panchami 2025 news in marathi,

या वर्षी नागपंचमी 29 जुलै 2025 रोजी साजरी केली जाणार आहे.भारतात अशी काही रहस्यमय नाग मंदिरं (Nag Mandir in India) आहेत जिथे हजारो नाग मूर्ती आहेत, जी वर्षातून फक्त एकदाच उघडली जातात? चला तर जाणून घेऊया अशाच या 7 अद्भुत मंदिरांविषयी!

Nag Panchami 2025, Do you know 7 mysterious Nag temples in India? Learn in detail. Nag Panchami 2025 news in marathi,

१. नागचंद्रेश्वर मंदिर, उज्जैन (मध्य प्रदेश)

उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराच्या परिसरात असलेलं हे मंदिर वर्षात फक्त एकदाच – नागपंचमीच्या दिवशी – दर्शनासाठी उघडलं जातं. इथे भगवान शिव व पार्वती एक अनोख्या मूर्तीत नागाच्या फणाखाली विराजमान आहेत. ही मूर्ती थेट नेपाळहून आणली गेली आहे. असं मानलं जातं की इथे पूजेनं कालसर्प दोष दूर होतो.

Nag Panchami 2025, Do you know 7 mysterious Nag temples in India? Learn in detail. Nag Panchami 2025 news in marathi,

२. कर्कोटक नागराज मंदिर, भीमताल (उत्तराखंड)

5000 वर्षांहून अधिक प्राचीन असलेलं हे मंदिर भीमतालमध्ये, कर्कोटक नावाच्या टेकडीवर वसलेलं आहे. स्कंद पुराणात याचा उल्लेख मिळतो. इथे पूजेनं सर्पदोष आणि वाईट स्वप्नांपासून सुटका मिळते, असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे.

३. सेम-मुखेम नागराज मंदिर, टिहरी (उत्तराखंड)

टिहरी जिल्ह्यातील सेम-मुखेममध्ये असलेलं हे मंदिर श्रीकृष्णाच्या नाग अवताराचं प्रतीक मानलं जातं. द्वारकेच्या जलांत विलीन झाल्यावर इथे नागराज स्वरूपात ते प्रकट झाले, अशी मान्यता आहे. इथे स्वयंभू शिला आहे जी नागराजाचं रूप मानली जाते.

Nag Panchami 2025, Do you know 7 mysterious Nag temples in India? Learn in detail. Nag Panchami 2025 news in marathi,

४. मन्नारशाला मंदिर, केरल

केरळमधील Alleppey जिल्ह्यातील हे मंदिर आपल्या 30,000 नाग मूर्तींसाठी जगप्रसिद्ध आहे! 16 एकरात पसरलेल्या या मंदिरात नागराज व त्यांची पत्नी नागयक्षी यांची पूजा होते. विशेषतः संतानप्राप्तीसाठी येणाऱ्या महिलांची मोठी श्रद्धा इथे पाहायला मिळते.

५. नाग वासुकी मंदिर, प्रयागराज (उत्तर प्रदेश)

प्रयागराजमधील हे प्रसिद्ध नाग मंदिर शिवाच्या गळ्यातील नाग ‘वासुकी’ यांचं रूप मानलं जातं. Nag Panchami ला इथे भव्य मेला भरतो. मंदिराला सर्पनाथ, शेषराज आणि अनंत असेही नावं आहेत. हजारो भाविक या दिवशी इथे गर्दी करतात.

६. तक्षकेश्वरनाथ मंदिर, प्रयागराज (उत्तर प्रदेश)
यमुना नदीच्या काठावर वसलेलं हे प्राचीन मंदिरही नागभक्तांसाठी महत्त्वाचं केंद्र आहे. इथे शिव आणि नागदेवतेची एकत्र पूजा केली जाते. असं मानलं जातं की इथे फक्त दर्शनानंही सर्पदोष आणि नागभय दूर होतो.

७. शेषनाग मंदिर, जम्मू-कश्मीर

कश्मीरमधील अनंतनाग भाग हे प्राचीन नागवंशीयांचं स्थळ आहे. पटनीटॉपजवळ पीर पंजाल पर्वतरांगात वसलेलं हे 600 वर्ष जुनं शेषनाग मंदिर नागपंचमीच्या दिवशी खास सजवलं जातं. इथे दरवर्षी मोठा उत्सव साजरा केला जातो.

Nag Panchami 2025 हा सण फक्त पूजा नव्हे, तर आपल्या प्राचीन संस्कृतीतील नागपूजेशी जोडलेला अद्भुत अनुभव आहे. जर तुम्ही या वर्षी काही वेगळं अनुभवन्याचा विचार करत असाल, तर वरील मंदिरांपैकी कुठेही भेट देणं नक्कीच तुमच्यासाठी एक आध्यात्मिक सफर ठरेल!