Dhruv Jurel : रांची कसोटीत ध्रुव जुरेल बनला भारताचा संकटमोचक, ध्रुव जुरेलचे शतक थोडक्यात हुकले, तिसऱ्या दिवसाचा हिरो ठरला ध्रुव जुरेल

  • हायलाईट्स
  • भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना (Ind vs Eng 4th test score)
  • इंग्लंड पहिला डाव 353
  • भारत पहिला डाव 307
  • ध्रुव जुरेलचे (Dhruv Jurel) पहिले अर्धशतक
  • इंग्लंडच्या शोएब बशीरने घेतल्या पाच विकेट्स

Ind vs Eng 4th test score : रांची येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावांत भारतीय संघ अडचणीत सापडला होता. 23 वर्षीय युवा विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) हा भारताच्या मदतीला धावून आला. त्याने तळाच्या फलंदाजांना सोबत घेत भारताला संकटातून बाहेर काढले. ध्रुव जुरेल याने कारकिर्दीतले पहिले अर्धशतक झळकावले. तो शतक झळकावणार असे वाटत असतानाच बाद झाला. रांची कसोटीच्या भारताच्या पहिल्या डावाचा ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) हा हिरो ठरला. भारताने पहिल्या डावांत 307 धावा केल्या. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेल यांनी अर्धशतके झळकावली.

ind vs eng 4th test score, Dhruv Jurel became India's Troubleshooter in Ranchi Test, Dhruv Jurel narrowly missed his century, Dhruv Jurel became  hero of third day

इंग्लंड विरूध्द भारत कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना रांची येथे खेळवला जात आहे. या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. इंग्लंडने पहिल्या डावांत 353 धावा केला. इंग्लंडकडून जो रूटने शतक झळकावले. भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. रांची कसोटीच्या दुसर्‍या दिवशी भारतीय संघ अडचणीत सापडला होता. 7 बाद 177 अशी अवस्था झाली होती. (Ind vs Eng 4th test score)

ind vs eng 4th test score, Dhruv Jurel became India's Troubleshooter in Ranchi Test, Dhruv Jurel narrowly missed his century, Dhruv Jurel became  hero of third day

भारतीय संघ 200 धावा पार करणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. पण भारताचा युवा विकेट किपर फलंदाज ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) याने कुलदीप यादवला सोबत घेत भारताचा डाव सावरला. दोघांनी आठव्या विकेट्ससाठी 76 धावा जोडल्या. कुलदीप यादव हा 131 चेंडूत 28 धावा बनवून बाद झाला. ध्रुव जुरेलने कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने 96 चेंडूत अर्धशतक पुर्ण केले. (Ind vs Eng 4th test score)

ind vs eng 4th test score, Dhruv Jurel became India's Troubleshooter in Ranchi Test, Dhruv Jurel narrowly missed his century, Dhruv Jurel became  hero of third day

अर्धशतक पुर्ण केल्यानंतर ध्रुव जुरेल हा शतकाकडे वाटचाल करत खेळत होता. तो शतक झळकावणार असे वाटत असतानाच तो 90 धावांवर बाद झाला. त्याने 149 चेंडूचा सामना करत 90 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याने भारताच्या पहिल्या डावांत सर्वाधिक धावा केल्या. त्याखालोखाल यशस्वी जैस्वाल याने 73 धावा केल्या. ध्रुव जुरेल बाद झाल्यानंतर भारताचा पहिला डाव 307 धावांवर अटोपला.(Ind vs Eng 4th test score)

  • भारतीय फलंदाजी खालील प्रमाणे (Ind vs Eng 4th test score)
  • यशस्वी जैस्वाल -76 धावा (8 चौकार, 1 षटकार)
  • रोहित शर्मा – 2 धावा
  • शुभमन गिल – 38 धावा (6 चौकार)
  • रजत पाटीदार – 17 धावा (4 चौकार)
  • रविंद्र जडेजा – 12 धावा (2 षटकार)
  • सरफराज खान – 14 (1 चौकार)
  • ध्रुव चंद जुरेल – 90 धावा ( 6 चौकार, 4 षटकार)
  • आर आश्विन – 1
  • कुलदीप यादव – 26 धावा (2 चौकार)
  • अकाश दीप – 09 (1 षटकार)
  • मोहम्मद सिराज – 00 नाबाद