Dr Manmohan Singh Death News : माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्या निधनाबद्दल ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Dr Manmohan Singh Death News : भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून १ जानेवारी २०२५ पर्यंत हा दुखवटा पाळला जाईल. या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल, कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत.

डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तसेच, त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी देश-विदेशातील सर्व भारतीय दूतावासांमध्येही राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येईल.
सलग १० वर्षे देशाचे पंतप्रधानपद भूषवणारे, महान अर्थतज्ञ, माजी पंतप्रधान डाॅ मनमोहन सिंग (Dr Manmohan Singh) यांचे २६ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ९ .५१ वाजता निधन (Death) झाले.
वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म पंजाबमधील गाह या ठिकाणी २६ सप्टेंबर १९३२ रोजी झाला होता. योगायोग म्हणजे डाॅ मनमोहन सिंग यांच्या जन्माची आणि मृत्यूची तारीख २६ आहे.
डाॅ मनमोहन सिंग यांचे कुटूंब फाळणीनंतर अमृतसरला स्थायिक झाले होते. त्यांनी १९५८ साली गुरशरण कौर यांच्याशी विवाह केला होता. त्यांना अमृत सिंग, दमन सिंग आणि उपिंदर सिंग या तीन मुली आहेत.