Best New Android Smart phones 2025 : iPhonचा गेम ओव्हर? ‘हे’ 5 प्रिमियम स्मार्टफोन ठरतायत सगळ्यांचे फेव्हरेट, सगळ्यात बेस्ट कोणता? वाचा सविस्तर

Best New Android Smart phones 2025 : भारतीय बाजारात सध्या आयफोनचं वर्चस्व वाढत चाललं आहे. तरूण वर्गात त्याची क्रेझ मोठी आहे परंतू असं असलं तरी काही टॉप क्लास Android स्मार्टफोन्स बाजारात आले आहे. हे फोन थेट आयफोनला टक्कर देताना दिसत आहेत. डिझाइन, फीचर्स, कॅमेरा आणि परफॉर्मन्समध्ये हे फोन्स कुठेही कमी नाहीत. काही फोल्डेबल आहेत, तर काही एकदम स्टायलिश आणि दमदार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या ५ स्मार्टफोन विषयी ! (Best New Android Smart phones 2025 July august)

Best New Android Smart phones 2025, iPhone's game over? 5 premium smartphones are becoming everyone's favorite, which one is the best? Read in detail, July august 2025,

Samsung Galaxy Z Fold 6

सॅमसंगचा नुकताच लॉन्च झालेला Galaxy Z Fold 6 हा एकदम जबरदस्त फोल्डेबल स्मार्टफोन आहे. यात 7.6 इंचाचा फोल्डेबल AMOLED 2X डिस्प्ले आणि 6.3 इंचाची कव्हर स्क्रीन मिळते.सुपरफास्ट Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, मल्टीटास्किंग, फ्लेक्स मोडसारख्या स्मार्ट फीचर्समुळे हा फोन एक पावरफुल फोन-टॅबलेट हायब्रिड बनतो. सॅमसंगने याला “२०२५ मधील सर्वोत्तम फोल्डेबल फोन” असं म्हटलं आहे! किंमत: ₹1,59,999 (Best New Android Smart phones 2025)

Samsung Galaxy Z Flip 6 – स्टाईल आणि दमदार परफॉर्मन्सचं परफेक्ट कॉम्बो!

हा फोन त्याच्या फॅशनेबल लूकमुळे आणि फ्लॅगशिप फीचर्समुळे प्रचंड लोकप्रिय आहे. 3.9 इंचाचा मोठा कव्हर डिस्प्ले, Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, 12GB RAM, 50MP कॅमेरा आणि AI बेस्ड बॅटरी ऑप्टिमायझेशनमुळे हा फोन अगदी परफेक्ट पॅकेज वाटतो. किंमत: ₹75,990 पासून सुरू (512GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी ₹71,990 पर्यंत उपलब्ध, Flipkart Axis Bank कार्डधारकांसाठी अतिरिक्त ₹4,000 डिस्काउंट) (Best New Android Smart phones 2025)

Vivo X200 Pro – नाईट फोटोग्राफीचे ‘ZEISS’ वॉव!

जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये लॉन्च होणारा हा फोन आधीच चर्चेत आहे. ZEISS क्वाड कॅमेरा सेटअप, 1 इंच Sony सेन्सर, पेरिस्कोप लेन्स आणि जबरदस्त नाईट फोटोग्राफीसाठी ओळखला जातो. मीडियाटेक Dimensity 9400 प्रोसेसर आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला 2K वक्र AMOLED डिस्प्ले यामुळे हा फोन भारीच वाटतो. अंदाजे किंमत: ₹94,999 (16GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंट).

Motorola Razr 50 Ultra – स्टाईलिश बॉडी, जबरदस्त इम्प्रेशन!

Motorola Razr 50 Ultra हा फोन फोल्डेबल कॅटेगरीतला स्टायलिश आणि टिकाऊ पर्याय आहे. Premium Vegan Leather फिनिश आणि वॉटर रेझिस्टन्समुळे त्याचं लुक्स आणि फील दोन्ही कमाल आहे. किंमत: ₹99,999 (12GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंट).

OnePlus Open – फोल्डेबल सेगमेंटमधलं OnePlusचं धमाकेदार कमबॅक!

OnePlus Open हा फोन फोल्डेबल आहे, पण त्यात क्रीज जवळपास जाणवतच नाही! 1 लाख 39 हजार 999 रुपयांना मिळणाऱ्या या फोनमध्ये आहे Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 16GB RAM, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 4805 mAh बॅटरी जी 67W ने फास्ट चार्ज होते. व्हेगन लेदर फिनिशही मिळतो – म्हणजे परफॉर्मन्स + लुक्स दोन्ही! किंमत: ₹1,39,999

तुम्ही जर आयफोन पेक्षा काही हटके आणि दमदार शोधत असाल, तर वरील ५ अँड्रॉइड स्मार्टफोन तुमच्यासाठी एकदम परफेक्ट पर्याय ठरू शकतात. या सर्व स्मार्टफोन्सची विक्री सध्या सुरू आहे. ते विविध ऑफर्ससह उपलब्ध आहेत. किंमत, स्टोरेज क्षमता, आणि ऑफर्सबाबत अधिकृत वेबसाइट्स आणि रिटेलर्सकडून ताज्या माहितीची पडताळणी करा. मगच फोन खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा ! (Best New Android Smart phones 2025)

Best New Android Smart phones 2025

Samsung Galaxy Z Fold 6
7.6 इंचाचा फोल्डेबल AMOLED 2X डिस्प्ले, 6.3 इंचाचा कव्हर स्क्रीन
सुपरफास्ट Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर
मल्टीटास्किंगसाठी हायब्रिड फोन-टॅबलेट अनुभव
किंमत: अंदाजे १.७ लाख रुपये (भारतीय बाजारात लवकरच उपलब्ध)

Samsung Galaxy Z Flip 6
3.4 इंचाचा कव्हर डिस्प्ले, Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर
12GB RAM आणि 50MP मुख्य कॅमेरा
स्टायलिश डिझाइन आणि टिकाऊ बॅटरी ऑप्टिमायझेशन
किंमत: सध्याच्या ऑफरमध्ये ₹71,990 पासून (भारत)

Vivo X200 Pro
MediaTek Dimensity 9400 प्रोसेसर, 6.78 इंचाचा 120Hz Quad Curved AMOLED डिस्प्ले
200MP मुख्य कॅमेरा, 1 इंचाचा सेन्सर, उत्कृष्ट नाईट फोटोग्राफी
किंमत: ₹94,999
उपलब्धता: प्री-ऑर्डर सुरु, खास ऑफर्ससह

Motorola Razr 50 Ultra
Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर
165Hz फोल्डेबल डिस्प्ले, IPX8 वॉटर रेसिस्टन्स
प्रीमियम व्हेगन लेदर बॉडी
किंमत: ₹99,999 (ऑफर्समध्ये कमी होते)

OnePlus Open
Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 16GB RAM
7.82 इंचाचा AMOLED फोल्डेबल डिस्प्ले
Hasselblad ट्यूनिंग कॅमेरा आणि 4805 mAh बॅटरी
किंमत: ₹1,39,999