Asia Cup 2025 Schedule : आशिया कप क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, आठ संघांचा सहभाग, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक !

Asia Cup 2025 Schedule : बहुप्रतिक्षित आशिया कप (Asia Cup 2025) क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून युनायटेड अरब अमिरात (UAE) येथे सुरू होणार आहे. या स्पर्धेत आठ संघाचा सहभाग असणार आहे. टी 20 फाॅर्मेटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan Asia Cup 2025) यांच्यात पुन्हा एकदा थरारक सामना रंगणार आहे.

Asia Cup 2025 Schedule, Asia Cup cricket tournament schedule announced, India-Pakistan will clash again, eight teams will participate, know the complete schedule,

भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील द्विपक्षीय क्रिकेट संबंध गेल्या अनेक वर्षांपासून बिघडलेले आहेत. दोन्ही संघ केवळ ICC आणि ACC स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात. यंदाच्या आशिया कपमध्येही या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात गट टप्प्यातील सामना होणार असून, दोन्ही संघ जर सुपर-4 मध्ये पोहोचले, तर 21 सप्टेंबर रोजी पुन्हा दोन्ही संघात सामना होण्याची शक्यता आहे.

Asia Cup 2025 Schedule : यजमानपदावरून निर्माण झाला होता वाद

पाकिस्तानकडे आशिया कप क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद होते. परंतू भारताने त्यावर आक्षेप नोंदवत पाकिस्तानमध्ये स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे ही स्पर्धा वादात सापडली होती. परंतू आता ही स्पर्धा ही स्पर्धा UAE मध्ये होणार आहे. त्यानुसार आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारत-पाकिस्तान सामन्यांसाठी चाहते उत्साही झाले असून, 14 आणि 21 सप्टेंबरला दोन्ही संघात होणाऱ्या सामन्याकडे साऱ्या जगाचे लक्ष असणार आहे. (Asia Cup 2025 Schedule )

एकूण ८ संघ होणार सहभागी

या वर्षीच्या आशिया कप स्पर्धेत एकूण ८ संघांचा सहभाग असणार आहे.यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, युएई, ओमान आणि हाँगकाँग या संघाचा समावेश आहे.

  • गट अ – भारत, पाकिस्तान, युएई, ओमान
  • गट ब – श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग

आशिया कप 2025 वेळापत्रक (Asia Cup 2025 Full Schedule)

Asia Cup 2025 Schedule ग्रुप स्टेज सामने :

  • 9 सप्टेंबर: अफगाणिस्तान vs हाँगकाँग
  • 10 सप्टेंबर: भारत vs युएई
  • 11 सप्टेंबर: बांगलादेश vs हाँगकाँग
  • 12 सप्टेंबर: पाकिस्तान vs ओमान
  • 13 सप्टेंबर: बांगलादेश vs श्रीलंका
  • 14 सप्टेंबर: भारत vs पाकिस्तान
  • 15 सप्टेंबर: श्रीलंका vs हाँगकाँग
  • 16 सप्टेंबर: बांगलादेश vs अफगाणिस्तान
  • 17 सप्टेंबर: पाकिस्तान vs युएई
  • 18 सप्टेंबर: श्रीलंका vs अफगाणिस्तान
  • 19 सप्टेंबर: भारत vs ओमान

सुपर-4 सामने:

  • 20 सप्टेंबर: B1 vs B2
  • 21 सप्टेंबर: A1 vs A2 (संभाव्य भारत-पाकिस्तान रिमॅच)
  • 23 सप्टेंबर: A1 vs B2
  • 24 सप्टेंबर: B1 vs A2
  • 25 सप्टेंबर: A2 vs B2
  • 26 सप्टेंबर: A1 vs B1

28 सप्टेंबर: अंतिम सामना (Asia Cup Final 2025)

आशिया कप स्पर्धेमुळे क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील थरारक लढत अनुभवता येणार आहे. T20 फॉरमॅट असल्यामुळे सामना अधिक जलद आणि रोमांचक असणार आहे. आशिया कप 2025 ही स्पर्धा केवळ चॅम्पियनशिपसाठीच नव्हे, तर 2026 टी20 वर्ल्ड कपपूर्वीची तयारी म्हणूनही पाहिली जात आहे.