Asia Cup 2025 Indian Team : आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा, संघात कोणाचा समावेश ? पहा संपूर्ण यादी
Asia Cup 2025 Indian Team : ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी BCCI च्या निवड समितीने भारतीय संघाची (team india) आज घोषणा केली. सुर्यकुमार यादव हा भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. तर टेस्ट संघाचा कर्णधार शुभमन गिल याच्याकडे अशिया कप स्पर्धेसाठी उप कर्णधार म्हणून संघात जबाबदारी देण्यात आली आहे.

भारताला अ गटात यजमान युएई, पाकिस्तान आणि ओमान यांचा सामना करावा लागणार आहे. १४ सप्टेंबरला India vs Pakistan यांच्यातल्या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे.
भारतीय संघ खालील प्रमाणे
सूर्यकुमार यादव, शुभमन गिल ( उप कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्थी. रिंकू सिंग
INDIA Squad Asia Cup 2025
Surya Kumar Yadav (C), Shubman Gill (VC), Abhishek Sharma, Tilak Varma, Hardik Pandya, Shivam Dube, Axar Patel, Jitesh Sharma (WK), Jasprit Bumrah, Arshdeep Singh, Varun Chakaravarthy, Kuldeep Yadav, Sanju Samson (WK), Harshit Rana, Rinku Singh
आशिया कप क्रिकेट स्पर्धा वेळापत्रक
9 सप्टेंबर: अफगाणिस्तान वि. हाँगकाँग, अबू धाबी
10 सप्टेंबर: भारत वि. यूएई, दुबई
11 सप्टेंबर: बांगलादेश वि. हाँगकाँग, अबू धाबी
12 सप्टेंबर: पाकिस्तान वि. ओमान, दुबई
13 सप्टेंबर: बांगलादेश वि. श्रीलंका, अबू धाबी
14 सप्टेंबर: भारत वि. पाकिस्तान, दुबई
15 सप्टेंबर: यूएई वि. ओमान, अबू धाबी
15 सप्टेंबर: श्रीलंका वि. हाँगकाँग, दुबई
16 सप्टेंबर: बांगलादेश वि. अफगाणिस्तान, अबू धाबी
17 सप्टेंबर: पाकिस्तान वि. यूएई, दुबई
18 सप्टेंबर: श्रीलंका वि. अफगाणिस्तान, अबू धाबी
19 सप्टेंबर: भारत वि. ओमान, अबू धाबी
20 सप्टेंबर: B1 वि. B2, दुबई
21 सप्टेंबर: A1 वि. A2, दुबई
23 सप्टेंबर: A2 वि. B1, अबू धाबी
24 सप्टेंबर: A1 वि. B2, दुबई
25 सप्टेंबर: A2 वि. B2, दुबई
26 सप्टेंबर: A1 वि. B1, दुबई
28 सप्टेंबर: अंतिम सामना, दुबई