जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ : प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध, हरकतीसाठी ही आहे अंतिम मुदत

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीमधून प्रारुप मतदार यादी तयार करण्यात येऊन ती ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत संबंधित तहसील कार्यालयात लेखी सादर करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी केले आहे.

Zilla Parishad, Panchayat Samiti General Election 2025, Draft voter list published, this is deadline for objections

निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात निरीक्षणासाठी व पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी त्यांच्या सूचना व हरकती विहित वेळेत दाखल कराव्यात. विहित वेळेनंतर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार केला जाणार नसल्याचेही कळविण्यात आले आहे.