जामखेड टाइम्स वृत्तसेवा : वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या जामखेड येथील अविष्कार (सोनू) गायकवाड या तरूण डाॅक्टरचे रविवारी रात्री सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे अपघाती निधन झाले.डाॅक्टरची पदवी घेण्यास सहा महिने बाकी असतानाच अविष्कारवर काळाने झडप घातली.मयत अविष्कार हा आदर्श प्राथमिक शिक्षक, साहित्यिक, बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड यांचा धाकटा मुलगा होता. या दुर्दैवी व दु:खद घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
