PSI Success Story : घरात अठरा विश्व दारिद्र्य.. राहायला छपराचे घर..वडिल सालकरी.. विपरीत परिस्थितीशी तो जिद्दीने लढला अन् पोलिस उपनिरीक्षक बनला ! वाचा जामखेड तालुक्यातील भाऊसाहेब गोपाळघरे या तरूणाची प्रेरणादायी यशकथा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । PSI Success Story । घरात अठरा विश्व दारिद्र्य, राहायला छपराचे घर, वडिल सालकरी, अश्या विपरीत परिस्थितीशी तो जिद्दीने लढला अन् पोलिस उपनिरीक्षक बनला. ही गोष्ट आहे भाऊसाहेब बलभीम गोपाळघरे या ध्येयवेड्या तरूणाची. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. या परीक्षेत जामखेड तालुक्यातील नागोबाचीवाडी येथील भाऊसाहेब बलभीम गोपाळघरे हा तरूण उत्तीर्ण झाला. तो पोलिस उपनिरीक्षक बनलाय, त्याचा हाच प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊयात ! (MPSC news)

PSI Success Story, Eighteen World Poverty home, chappar house to live in, Father Salkari, He fought stubbornly against odds and became Police Sub-Inspector, Read inspiring success story of PSI Bhausaheb Gopalghare from Jamkhed taluka,

बालाघाट डोंगररांगेत वसलेलं नागोबाचीवाडी एक छोटेसं दुर्गम खेडेगाव. ऊसतोड मजुरांचे गाव अशी या गावाची ओळख. जिरायत शेती, पाण्याची टंचाई अश्या परिस्थितीत येथील नागरिकांना जगण्याच्या लढाईचा संघर्ष ठरलेला. याच गावात बलभीम गोपाळघरे यांचं कुटूंब राहतं, घरात अठरा विश्व दारिद्र्य, पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात मजुरी करणे, ऊसतोड मजूर म्हणून काम करणे असो की, सालगडी म्हणून काम करणे हेच या कुटुंबाच्या नशिबी. मिळेल ते काम करून, सालकरी म्हणून बलभीम व मंगल गोपाळघरे हे पती पत्नी आपल्या कुटूंबाचा गाडा हाकत होते. बलभीम गोपाळघरे हे पायाने अपंग आहेत. अश्याही परिस्थितीत त्यांचा संघर्ष सुरु होता. आपला मुलगा भाऊसाहेब याच्यात मंगल व बलभीम गोपाळघरे यांनी आपले स्वप्न पाहिले. भाऊसाहेब हाच आपली परिस्थिती बदलू शकतो, हा विश्वास उराशी बाळगून मंगल व बलभीम गोपाळघरे या पती पत्नीने त्याच्या शिक्षणासाठी प्रचंड कष्ट घेतले.

PSI Success Story, Eighteen World Poverty home, chappar house to live in, Father Salkari, He fought stubbornly against odds and became Police Sub-Inspector, Read inspiring success story of PSI Bhausaheb Gopalghare from Jamkhed taluka,

घरात अठरा विश्व दारिद्र्य, राहायला छपराचे घर, वडिल सालकरी, आपली गरिबी आहे याचे भांडवल करून रडत न बसता, आपल्या नशिबी आलेल्या विपरीत परिस्थितीशी दोन हात करत, भाऊसाहेब गोपाळघरे या जिद्दी तरूणाने आई वडिलांच्या आशिर्वादाने जग जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगले. जिद्द चिकाटी व कठोर मेहनतीच्या जीवावर भाऊसाहेबचे शैक्षणिक मार्गक्रमण सुरु होते. अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगलेल्या भाऊसाहेबने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला होता.

भाऊसाहेब गोपाळघरे याचा लहान भाऊ रोहिदास व आई वडील मोलमजुरी करून भाऊसाहेबच्या शिक्षणास पैसे पाठवत होती. लहान भाऊ असतानाही त्याने आपल्या  भावासाठी मेहनत घेतली.मुलाच्या शिक्षणासाठी कुठल्याही उत्पन्नाच स्तोत्र नसल्याने आई वडील सोलापूर जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्याकडे सालकरी म्हणून कामास राहून आपल्या मुलाला शिक्षणासाठी पैसा पुरवला.नागोबाचीवाडी येथे राहायला छपराचे घर व जिराईत जमीन अशा दुर्गम परिस्थितीत भाऊसाहेब याने आपल्या गरिबीची जाण ठेवून अभ्यासात सातत्य ठेवले.

भाऊसाहेब बलभीम गोपाळघरे याचे प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी उंबरे तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथे तर माध्यमिक शिक्षण पाचवी ते नववी आश्रम शाळा सोलापूर येथे तर दहावी ते बारावी विद्यालय शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा येथे झाले. यानंतर 2015 साली कृषी महाविद्यालय पुणे येथे कृषी पदवी घेतली. कुठलाही खाजगी क्लासेस शिकवणी न लावता राहुरी कृषी विद्यापीठ येथे राहून रात्रंदिवस चिकाटीने अभ्यास करून त्याने स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले. गरीब कुटुंबात जन्मलेल्या अन् सालगडयाचा मुलगा असलेल्या भाऊसाहेब गोपाळघरे याने पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.भाऊसाहेब पोलीस इन्स्पेक्टर झाल्याचे समजताच आई-वडिलांसह त्याच्या भावाला आनंदाश्रू अनावर झाले होते. (Mpsc success story in marathi)

स्व- अभ्यासातून MPSC त घवघवीत यश

नागोबाचीवाडी येथील तरूण भाऊसाहेब गोपाळघरे या तरूणाने घरच्या गरिब परिस्थितीची जाणीव ठेवत स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी खाजगी क्लासेस न लावता सेल्फ स्टडीवर भर दिला. रोज दहा ते बारा तास अभ्यास केला. MPSC चा 2015 पासून अभ्यास करणाऱ्या भाऊसाहेबने 2022 पर्यंत चार PSI च्या परीक्षा तसेच इतरही अनेक परीक्षा दिल्या त्यात त्याला यश मिळाले नाही. 2017 ला भाऊसाहेबने पहिली PSI ची परिक्षा दिली होती. पहिल्याच प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत गेला होता. पण त्याला यशाने हुलकावणी दिली होती. त्यानंतर भाऊसाहेब याने हार न मानता अभ्यास सुरु ठेवला होता. 2017 ते 2022 या काळात भाऊसाहेबने 5 वेळा PSI परीक्षा दिली. यात त्याला 4 वेळा अपयश आले. मात्र 2023 च्या निकालात तो यशस्वी ठरला. कष्टकरी कुटूंबातील लेक आता पोलिस उपनिरीक्षक बनलाय.

भाऊसाहेबने आम्ही घेतलेल्या कष्टांचं पांग फेडलं

मी गरिबीशी लढत होतो. माझ्या मुलाने खूप शिक्षण घ्यावं, त्याने शिकून स्वता:सह कुटूंबाचं नशिब बदलावं ही इच्छा होती. भाऊसाहेबने आम्ही घेतलेल्या कष्टांचं पांग फेडलं. त्याने कठोर मेहनत घेतली, तो फौजदार बनला, खूप आनंद झालाय अशी प्रतिक्रिया बलभीम गोपाळघरे यांनी दिली.

मोठ्या भावासाठी लहान भावाने घेतले कष्ट

गरिब कुटूंब असलेल्या गोपाळघरे कुटूंबातील भाऊसाहेब गोपाळरे हा तरूण पोलिस उपनिरीक्षक बनला आहे. त्याच्या या यशात त्याचा लहान भाऊ रोहिदास याचा मोठा वाटा आहे. रोहिदास याने बारावीनंतर शिक्षण सोडत आई वडिलांच्या मदतीला गेला. आई वडिल आणि रोहिदास यांनी भाऊसाहेब याच्या शिक्षणासाठी काबाडकष्ट करत भाऊसाहेबच्या शिक्षणाचा खर्च उचलला.मोठ्या भावासाठी लहान भावाने त्याग करून मोठ्या भावाला अधिकारी करण्यासाठी घेतलेली मेहनत नवा आदर्श निर्माण करणारी ठरली आहे. भाऊसाहेबने मिळवलेले यश जितके कौतुकास्पद आहे, त्याहून अधिक त्याच्या भावाने त्याच्यासाठी जो त्याग केला. तेही कौतुकास्पद आहे. भावाभावात खरं प्रेम असावं तर असं हेच यातून सिध्द होत आहे.

जो स्टेबल राहतो त्यालाच यश मिळते – भाऊसाहेब गोपाळघरे

जेव्हा आपल्याला वाटतं आयुष्यात काहीच होणार नाही, तेथून पुढे आपण टिकून रहायला हवं, MPSC हे अनिश्चिततेचं क्षेत्र आहे. यात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला हमखास पोस्ट भेटेल अशी कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. अनेकदा यात अपयश येतं.अपयशाने खचून न जाता, नैराश्यग्रस्त न होता.आपण आपला अभ्यास सतत सुरु ठेवावा. स्टेबल रहावं. मीही चारदा पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत नापास झालो. पण खचलो नाही. आपले सर्वोत्तम प्रयत्न चालू ठेवले. पाचव्या प्रयत्नात यश आले. जो स्टेबल राहतो त्यालाच यश मिळते, अशी प्रतिक्रिया पोलिस उपनिरीक्षक बनलेल्या भाऊसाहेब बलभीम गोपाळघरे याने जामखेड टाइम्सशी बोलताना दिली.

…तरच कुठलीही लढाई जिंकता येते

दरम्यान, यश मिळवायचं असेल तर कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. तुम्ही परिस्थिती चांगली की वाईट यापेक्षा तुम्ही पाहिलेलं स्वप्न हे सत्यात उतरवण्यासाठी तुमच्या अंगी जिद्दी हवी, लढण्याची चिकाटी हवी,यश मिळवण्याची भूक हवी, तरच कुठलीही लढाई जिंकता येते हेच भाऊसाहेब गोपाळघरे या तरूणाने सिध्द केले आहे. भाऊसाहेब गोपाळघरे याने पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.