…तर महावितरण अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही, राष्ट्रवादीचे युवा नेते रमेश आजबे यांचा इशारा, वीज प्रश्नांवर जामखेडमध्ये पार पडला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। राज्यात सत्तेवर आलेले खोके सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या बळीराजा दिलासा देण्याऐवजी शिंदे -फडणवीस सरकारने वीज बीलाच्या माध्यमांतून जुलमी वसुली हाती घेतली आहे.महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांचे सर्व वीज बील भरावे. वीज बील वसुलीच्या नावाखाली महावितरणने जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास महावितरण अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही,असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते रमेश (दादा) आजबे यांनी दिला.

Mahavitaran will not allow officials to sit in the office, NCP's youth leader Ramesh Ajbe warned, Mahavikas Aghadi's outcry march was held in Jamkhed on electricity issues,

महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीने सोमवारी विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाची सुरुवात जामखेड पंचायत समिती कार्यालयापासून झाली. त्यानंतर हा मोर्चा जामखेड तहसिल कार्यालयावर जाऊन धडकला. या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते रमेश (दादा) आजबे बोलत होते.

यावेळी बोलताना रमेश दादा आजबे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर आजचा मोर्चा होऊ नये यासाठी भाजपच्या काही कार्यकर्त्यांकडून समाज माध्यमांतून चुकीचे मेसेज फिरवले जात होते. महावितरणला सरकारकडून एक वीज बील वसुलीचे आदेश आहेत, त्याविरोधात महाविकास आघाडीने आजचा मोर्चा आयोजित केला होता. जर महावितरण तातडीने जुलमी वीज बील वसुली न थांबवल्यास तीव्र अंदोन छेडण्याचाही इशारा यावेळी आजबे यांनी दिला.

Mahavitaran will not allow officials to sit in the office, NCP's youth leader Ramesh Ajbe warned, Mahavikas Aghadi's outcry march was held in Jamkhed on electricity issues,

आजबे पुढे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्तेत नसताना वेगळे बोलतात आणि सत्तेत असताना वेगळे बोलतात, फडणवीस हे रडीचा डाव खेळतात असे सांगत आजबे यांनी फडणवीस यांची विरोधी पक्ष नेता असतानाचा एक व्हिडिओ क्लिप उपस्थितांना ऐकवली. फडणवीस यांच्याकडे आता ऊर्जा विभाग आहे. त्यांनी तातडीने महावितरणला वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम थांबवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी यावेळी आजबे यांनी केली.

दरम्यान अंदोलनानंतर महवितरण अधिकारी योगेश कासलीवाल, नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांना अंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या मागण्या शासनाकडे पोहोचवल्या जातील असे अश्वासन दिले. त्यानंतर अंदोलन संपविण्यात आले. अंदोलनस्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

यावेळी राजेंद्र कोठारी, मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, विजयसिंह गोलेकर, संजय वराट, काँग्रेसचे शहाजीराजे भोसले सह आदींची भाषणे झाली. सर्वांनीच शिंदे -फडणवीस सरकार विरोधात टीकेची झोड उठवली. शेतकरी विरोधी शिंदे – फडणवीस सरकारचा यावेळी सर्वच नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.