कर्जतमध्ये मतदानाचा टक्का वाढला; मतदान शांततेत सुरू

 

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : कर्जत नगरपंचायतीसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६५.७७% मतदान पार पडले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली.

सकाळी ११ पर्यंत मतदारांचा निरुत्साह होता मात्र १२ नंतर मतदारांनी रांगा लावत मतदान केले. यावेळी आ रोहित पवार आणि माजीमंत्री राम शिंदे यांनी १५ मतदान केंद्रावर भेटी दिल्या.

In Karjat, the turnout increased; Voting begins peacefully

कर्जत नगरपंचायतीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया सुरु असून १२ जागेसाठी १५ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस आणि भाजपा यामध्ये सरळ लढत पाहायला मिळत असून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६५.७७% मतदान पार पडले होते. यावेळी सर्वत्र शांततेत मतदान सुरू असल्याची माहिती कर्जत प्रशासनाने दिली.

In Karjat, the turnout increased; Voting begins peacefully

दुपारी साडेतीन वाजेपर्यंत झालेले मतदान खालील प्रमाणे

प्रभाग एकुण मतदानझालेले मतदानटक्केवारी
प्रभाग क्रमांक 4 (माळेगल्ली)92749953.82%
प्रभाग क्रमांक 6 (यासिननगर) 553 42176.13%
प्रभाग क्रमांक 8 (शाहूनगर) 84647656.26%
प्रभाग क्रमांक 9 समर्थनगर 68143463.72%
प्रभाग क्रमांक 10 (बेलेकर काॅलनी) 975 65667.20%
प्रभाग क्रमांक 11 (बर्गेवाडी) 58651387.54
प्रभाग क्रमांक 12 शहाजीनगर 122182267.12%
प्रभाग क्रमांक 13 (गोदड महाराज गल्ली) 818 46456.72%
प्रभाग क्रमांक 14 (सोनार गल्ली) 59442771.88%
प्रभाग क्रमांक 15 (भवानीनगर) 928 57361.74%
प्रभाग क्रमांक 16 (अक्काबाई नगर ) 721 46264.07
प्रभाग क्रमांक 17 (भांडेवाडी) 1466103871%