• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Sunday, February 15, 2026

Jamkhed Times Jamkhed Times - Local Marathi News & Live Updates

  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
    • All
    • मनसे
    • शिवसेना
    • भाजप (bjp news)
    • काँग्रेस
    • राष्ट्रवादी
    • सामाजिक राजकीय संघटना
    महाराष्ट्र

    ब्रेकिंग न्यूज:जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांना मुदतवाढ; सुप्रीम कोर्टाचा राज्य…

    महाराष्ट्र

    Rajendra Pawar : आर डी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवारांचा भाजपात प्रवेश,…

    राजकारण

    जामखेड : तीन वर्षात तीन उपसभापती, पहिला नंबर नंदकुमार गोरेंचा, प्रा राम शिंदेंच्या…

    Prev Next
  • गावगाडा। Gavgaada
    • अंदोलन
    • गावकारभार
    • गावकी – भावकी
    • ग्रामपंचायत निवडणुक
    • महिलाजगत
    • शिवारफेरी
    • Jamkhed NagarParishad
      • नगरपरिषद निवडणुक 2021
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • देश
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • माहिती व तंत्रज्ञान
  • हॅलो पोलिस स्टेशन
    • आजची फिर्याद
    • खाकीतली माणुसकी
  • होऊ दे चर्चा
  • संपादकीय
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Jamkhed Times
  • Home
  • महाराष्ट्र
  • पश्चिम महाराष्ट्र
  • Ankita Patil : हर्षवर्धन पाटलांच्या लेकीचा अजित पवारांवर गंभीर आरोप, बारामती लोकसभेचे राजकीय वातावरण तापले !

Ankita Patil : हर्षवर्धन पाटलांच्या लेकीचा अजित पवारांवर गंभीर आरोप, बारामती लोकसभेचे राजकीय वातावरण तापले !

पश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र
By Team jamkhedtimes.com On Feb 18, 2024
Ankita Patil, Harshvardhan Patil daughter has made serious allegations against Ajit Pawar, the political atmosphere of Baramati Lok Sabha constituency has heated up,
Share

Ankita Patil : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अश्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचे टेन्शन वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील (Harshvardhan Patil daughter Ankita Patil) यांनी केलेले एक वक्तव्य आता चर्चेत आले आहे. त्यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. अंकिता पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या चर्चांनी जोर धरला आहे.

Ankita Patil, Harshvardhan Patil daughter has made serious allegations against Ajit Pawar, the political atmosphere of Baramati Lok Sabha constituency has heated up,
चर्चेतल्या बातम्या

जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय,…

Jan 22, 2026

Ram Shinde: शुक्रवारी जामखेडमध्ये होणार भाजपच्या ऐतिहासिक…

Dec 24, 2025

महाविकास आघाडीत असताना अजित पवार यांनी आम्हाला तीनदा शब्द दिला, पण त्यांनी तो शब्द पाळला नाही. त्यांनी आमची फसवणूक केली, आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असा खळबळजनक आरोप अंकिता पाटील (Ankita Patil)) यांनी केला आहे.

अंकिता पाटील पुढे म्हणाल्या की, आता आम्ही महायुतीत आहोत. पण विधानसभेला जे आमचं काम करतील त्यांनाच आम्ही लोकसभेला मदत करू असे म्हणत पाटील यांनी लोकसभेच्या आखाड्यातून आमदारकीची बांधणी हाती घेतल्याचे स्पष्ट होत आहे. बारामती लोकसभेच्या जागेवरून अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या गटामध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे. अंकिता पाटील आणि राजवर्धन पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून बारामतीतील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.सध्या घडत असलेल्या घडामोडींवरून पवार आणि पाटील गटांमध्ये आणखीन अंतर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार यांनी शुक्रवारी बारामतीत राष्ट्रवादीचा मेळावा घेत बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मोठ्या ताकदीने लढवणार असल्याचे जाहीर केले. हे जाहीर करताना लोकसभेचा उमेदवार निवडून दिला तरच विधानसभा निवडणुक लढवणार अशी घोषणा केली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) ह्या बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवार असतील असेच संकेत अजित पवारांनी बारामतीच्या मेळाव्यातून दिले. बारामती लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या इंदापूर मतदारसंघात याचे पडसाद उमटले आहेत.

इंदापूर या मतदारसंघात पुर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आमदार असायचे पण त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून ते राजकीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत दत्ता मामा भरणे यांनी पाटील यांचा पराभव केला होता. पाटील यांचा पराभव अजित पवार यांनीच घडवून आणला होता, असे सातत्याने बोलले जाते. 2024 ची विधानसभा पुर्ण ताकदीने लढवण्याची तयारी हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबाने हाती घेतली आहे.

अंकिता पाटील यांनी आधी लोकसभेची तयारी हाती घेतली होती, परंतू अजित पवार यांचा महायुतीत समावेश झाला. बारामतीची जागा ते आपल्याकडे ठेवून या जागेवर सुनेत्रा पवार यांना मैदानावर उतरवणार असे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे अंकिता पाटील यांचे नाव लोकसभेच्या शर्यतीतून मागे पडले आहे. आता अंकिता पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी अजित पवारांनी पाटील कुटूंबाची तीनदा फसवणूक केल्याची गोष्ट जगजाहीर करून पक्षाला आणि अजित पवारांना द्यायचा तो संदेश दिला आहे.

अंकिता पाटील काय म्हणाल्या ?

महाविकास आघाडीत असताना अजित पवारांनी आम्हाला तीनदा शब्द दिला, शब्द देऊन तो फिरवण्यात आला, आमची फसवणूक करण्यात आली. आमच्या पाठीत खंजीर तपासण्यात आला. आता आम्ही महायुतीमध्ये आहोत .त्यामुळे विधानसभेला जे आमचे काम करतील, त्यांना आम्ही लोकसभेला मदत करू, असा इशारा यावेळी अंकिता पाटील यांनी बोलताना दिला आहे. त्याबरोबर हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनीही एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, काहीही झालं तरी आम्ही इंदापूरची विधानसभा निवडणूक लढवणारच.

Ankita Harshvardhan PatilAnkita PatilAnkita Patil : हर्षवर्धन पाटलांच्या लेकीचा अजित पवारांवर गंभीर आरोपAnkita Patil indapurAnkita Patil latest NewsAnkita Patil NewsAnkita Patil news indapurAnkita Patil news marathi
Share FacebookTwitterEmailTelegramWhatsApp
Team jamkhedtimes.com

http://jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

Ind vs Eng 3rd Test Highlights : यशस्वी जयस्वालचे शानदार शतक, शुभम गिलचे अर्धशतक, भारताने इंग्लंड विरुद्ध घेतली 322 धावांची आघाडी, तिसरी कसोटी रोमांचक स्थितीत

Next Post

IND vs ENG 3rd TEST LIVE : यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खानचा संडे धमाका, जयस्वालचे धमाकेदार द्विशतक तर खानचे अर्धशतक, इंग्लंडपुढे विजयासाठी 557 धावांचे तगडे आव्हान !

You might also like More from author
महाराष्ट्र

जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय, सुधारित अंदाजपत्रकास…

महाराष्ट्र

Ram Shinde: शुक्रवारी जामखेडमध्ये होणार भाजपच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष !

महाराष्ट्र

जामखेड येथील बैलगाडा शर्यतीत मोठी दुर्घटना, बैलगाड्याच्या धडकेत अंकुश महाराज वाळके…

महाराष्ट्र

जामखेड : प्रभाग अकरामध्ये मातोश्रींचा ऐतिहासिक विजय अन् सागरभाऊ टकले यांच्या…

Prev Next
Stay With Us
  • FacebookLikes Like our page
  • InstagramFollowers Follow Us
  • TwitterFollowers Follow Us
  • 22,300Subscribers Subscribe

Latest News

महाराष्ट्र

खळबळजनक : बनावट दुध तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, एलसीबीच्या छापेमारीत केमिकल व…

Team jamkhedtimes.com Feb 14, 2026

धक्कादायक: विषारी ड्रग्जचे लोण जामखेडमध्ये, १० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त,…

Feb 14, 2026

मोठी बातमी : सहाय्यक प्राध्यापक भरतीची प्रतीक्षा संपली ! ५,०१२…

Feb 13, 2026

ऐतिहासिक निर्णय: महाराष्ट्रात जमिनीच्या ‘NA’ परवानगीची अट…

Feb 11, 2026
Prev Next 1 of 925
जामखेड टाईम्स
jamkhed taluka Local news
By Jamkhed Times
1 / 3
  1. 1 जामखेड ब्रेकिंग: पुतण्याने केला चुलत्याचा खु&न, जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील घटना जामखेड ब्रेकिंग: पुतण्याने केला चुलत्याचा खु&न, जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील घटना 00:42
  2. 2 जामखेड ब्रेकिंग : १७ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृ&त्यू, धानोरा येथील हृदयद्रावक घटना, jamkhed news जामखेड ब्रेकिंग : १७ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृ&त्यू, धानोरा येथील हृदयद्रावक घटना, jamkhed news 01:19
  3. 3 jamkhed news : जामखेडमध्ये भीषण अपघात, दोन जण गंभीर जखमी jamkhed news : जामखेडमध्ये भीषण अपघात, दोन जण गंभीर जखमी 00:57

- Advertisement -

  • Home
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
© 2026 Jamkhed Times. All Rights Reserved.
You cannot print contents of this website.