जामखेड : समाजहितासाठी केलेले कार्यच खरी शुभेच्छा; वाढदिवसानिमित्त सभापती प्रा. राम शिंदेंचे कार्यकर्त्यांना महत्वाचे आवाहन

जामखेड टाइम्स वृत्तसेवा | सत्तार शेख : महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा वाढदिवस १ जानेवारी रोजी असून, या निमित्ताने त्यांनी समाजाला एक वेगळा, प्रेरणादायी संदेश दिला आहे. वाढदिवस साजरा करताना वैयक्तिक अभिनंदन, भेटवस्तू अथवा स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन टाळून, हा दिवस समाजोपयोगी उपक्रमांसाठी समर्पित करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Welfare of society for greater good is the true birthday wish, Sabhapati Ram Shinde appeals to party workers, karjat jamkhed latest news today,

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे हे वाढदिवसाच्या दिवशी सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत चोंडी येथील आपल्या निवासस्थानी उपस्थित राहणार आहेत. याबाबत शिंदे यांनी स्वता: फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी वाढदिवसानिमित्त सत्कार, भेटवस्तू किंवा मोठ्या समारंभांऐवजी समाजासाठी काहीतरी विधायक कार्य करावे, असे अवाहन आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना केले आहे.

Welfare of society for greater good is the true birthday wish, Sabhapati Ram Shinde appeals to party workers, karjat jamkhed latest news today,

वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक उपक्रम व विद्यार्थ्यांना मदत, सामाजिक सेवाभावी कार्य, गरजू व वंचित घटकांना आवश्यक ती मदत या सामाजिक उपक्रमाच्पा माध्यमांतून आपला वाढदिवस साजरा करावा असे अवाहन शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट द्वारे केले आहे. समाजात सकारात्मक बदल घडवणे, हीच खरी वाढदिवसाची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

‘समाजहितासाठी केलेले कार्यच खरी शुभेच्छा’

“समाजहितासाठी केलेले कार्यच माझ्यासाठी खरी वाढदिवसाची शुभेच्छा आहे,” असे भावनिक व अर्थपूर्ण मत व्यक्त करत, प्रा. राम शिंदे यांनी आपला वाढदिवस साधेपणाने आणि समाजाच्या हितासाठी साजरा करण्याचा संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

समाजोपयोगी उपक्रमाची सकारात्मक चळवळ

राजकारणात उच्च पदावर असतानाही साधेपणा, सामाजिक भान आणि लोकाभिमुख दृष्टिकोन जपणारे नेतृत्व म्हणून प्रा. राम शिंदे यांची ओळख आहे. त्यांच्या या आवाहनामुळे कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांमध्ये समाजोपयोगी उपक्रम राबवण्याची सकारात्मक चळवळ कर्जत-जामखेड मतदारसंघात निर्माण होण्यास मदत होणार आहे.