UPSC Result 2025 : जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा! हेल्परचा मुलगा बनला IPS, यूपीएससीत Nikhil Tambe ची उत्तुंग भरारी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख। UPSC Result 2025 Maharashtra : जिद्द आणि कष्टाच्या जोरावर अशक्य वाटणारी स्वप्नेही सत्यात उतरवता येतात, हेच जामखेड (Jamkhed) तालुक्यातील अरणगावच्या (Arangaon) सुपुत्राने सिद्ध केले आहे. जामखेड एसटी आगारात हेल्पर म्हणून कार्यरत असलेल्या काशिबा तांबे (Kashiba Tambe) यांचा मुलगा निखिल तांबे (Nikhil Tambe) याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. अवघ्या २३ व्या वर्षी निखिलने देशात ५१७ वा रँक मिळवत ‘आयपीएस’ (IPS) पदाला गवसणी घातली आहे.

UPSC Result 2025 Maharashtra,crown of honor on Jamkhed head, Helper's son becomes IPS, Nikhil Tambe soaring performance in UPSC, success story, Arangaon IPS,

UPSC तर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत देशभरातून ९५८ उमेदवार यशस्वी झाले आहेत.यात महाराष्ट्रातील ६० उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील निखील तांबे याचा समावेश आहे. निखीलने UPSC मध्ये घवघवीत यश संपादन करत यशाचा झेंडा फडकावला. तो आता IPS बनणार आहे. जामखेड तालुक्याच्या शिरपेचात यानिमित्ताने आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. (UPSC Result 2025 Maharashtra)

काही स्वप्ने डोळ्यांत नसून रक्तात भिनावी लागतात, तेव्हाच ती पूर्ण होतात. जामखेड एसटी डेपोमध्ये गाड्या दुरुस्त करणाऱ्या एका ‘हेल्पर’चा मुलगा उद्याचा ‘आयपीएस’ अधिकारी होईल, असं कुणाला वाटलं होतं? पण अरणगावच्या निखिल तांबे याने हे करून दाखवलंय. तेही चक्क वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी. जे वय उनाडक्या करण्याचं असतं त्याच वयात निखीलने मोठ्या स्वप्नाचा पाठलाग करायचं ठरवलं आणि ते स्वप्न पूर्णत्वास नेलं. गरिबीच्या हलाखीतून बाहेर पडण्याचा मार्ग त्याने शिक्षणातून निवडला. निखीलचे हे यश केवळ जामखेडच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. (UPSC Result 2025 Maharashtra)

UPSC Result 2025 Maharashtra,crown of honor on Jamkhed head, Helper's son becomes IPS, Nikhil Tambe soaring performance in UPSC, success story, Arangaon IPS,

अरणगाव येथील रहिवासी असलेल्या निखिलचे प्राथमिक शिक्षण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे आपल्या मावशीकडे झाले. त्यानंतर त्याने पुणे येथून आपले बीएससीचे (BSc) शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती बेताची असतानाही, वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून निखिलने दिल्ली किंवा मोठ्या शहरांचा मोह न धरता अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. आज त्याच्या या यशामुळे अरणगावसह संपूर्ण जामखेड तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, एका सामान्य कामगाराचा मुलगा आता देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणार आहे. (UPSC Result 2025 Maharashtra)

​मावशीच्या घरी शिक्षणाचे बाळकडू

​निखिलचा प्रवास सोपा नव्हता. घरची परिस्थिती आणि वडिलांच्या तुटपुंज्या पगारात शिक्षण पूर्ण करणे आव्हानात्मक होते. त्यामुळे निखिलचे बालपण आणि शालेय शिक्षण सिल्लोड (जि. संभाजीनगर) येथे त्याच्या मावशीकडे झाले. तिथूनच त्याने जिद्दीने अभ्यासाला सुरुवात केली.

​UPSC Result 2025 : पुण्यात पदवी आणि यूपीएससीचे ध्येय

​उच्च शिक्षणासाठी निखिल पुण्यात आला. पुण्याच्या शैक्षणिक वातावरणात वावरताना त्याने ‘बीएससी’ पूर्ण केली. पण डोळ्यांसमोर एकच ध्येय होते— यूपीएससी! वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी, जिथे मुलं उनाडक्या करतात, करिअरची दिशा शोधत असतात, तिथे निखिलने देशातील सर्वात कठीण परीक्षा पहिल्याच प्रयत्नांत ५१७ रँकसह यशस्वी करून दाखवली. (Nikhil Tambe IPS)

​वडिलांच्या कष्टाचे सार्थक

​निखिलचे वडील काशिबा तांबे हे जामखेड आगारात हेल्पर म्हणून काम करतात.आज निखिल आयपीएस झाला, तेव्हा वडिलांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू सर्व काही सांगून गेले. एका हेल्परच्या मुलाने खाकी वर्दीतील उच्च पद मिळवून आपल्या वडिलांच्या आणि संपुर्ण कुटूंबाच्या कष्टाचे सोने केले आहे.(Nikhil Tambe IPS)

​थोडक्यात प्रवास:

  • ​नाव: निखिल काशिबा तांबे
  • गाव: अरणगाव, ता. जामखेड, अहिल्यानगर
  • शिक्षण: बीएससी (पुणे)
  • यश: यूपीएससी परीक्षा (रँक ५१७)
  • पद: आयपीएस (IPS)

​निखिलचा हा प्रवास जामखेड आणि महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो लाखो तरुण-तरुणींसाठी दीपस्तंभ ठरणार आहे. “जर तुमची जिद्द मोठी असेल, तर परिस्थिती कधीच आडवी येत नाही,” हाच संदेश निखिलच्या या यशातून मिळतो. निखीलच्या या यशाबद्दल तांबे कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (UPSC Result 2025 Maharashtra)