महाराष्ट्रात अवकाळी पावसाने उडवला हाहाकार! गारपिटीचा तडाखा; अहिल्यानगरसह २४ जिल्ह्यांना ‘ऑरेंज व येलो अलर्ट’
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात अवकाळी पावसाने भीषण रूप धारण केले असून, गेल्या २४ तासांत अनेक भागांत झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत केले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) १८ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत कळीचे असून तब्बल १८ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

राज्यात अवकाळी पावसाने भीषण रूप धारण केले असून, काल दिवसभर आणि रात्रभर अनेक भागांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागांना गारपीटीचा जोरदार तडाखा बसला. पिके फळबागा जमीनदोस्त झाल्या.अस्मानी संकटामुळे द्राक्ष, टरबूज आणि रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकरी पुन्हा एकदा संकटाच्या गर्तेत सापडला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजाच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) १८ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीची दाट शक्यता वर्तवली आहे. प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
सांगलीत ‘बर्फाची चादर’; सोलापूर-मराठवाडा गारपिटीने हादरला
मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि मिरज पट्ट्यात निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. मिरज तालुक्यातील बेडग आणि आरग परिसरात इतकी भीषण गारपीट झाली की, शेतात आणि रस्त्यांवर पांढऱ्याशुभ्र गारांचा खच साचला होता. सोलापूरच्या अक्कलकोट परिसरातही विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला. मराठवाड्यातील लातूर (औसा, निलंगा), नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांत रात्रभर झालेल्या गारपिटीने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
१८ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’
भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, बुधवारी १८ मार्च रोजी दुपारी १२.२६ वाजता जारी केलेल्या अधिकृत जिल्हानिहाय अंदाजानुसार राज्यातील तब्बल १८ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत आज ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची आणि गारपीट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ऑरेंज अलर्ट असलेले १८ जिल्हे
- पश्चिम महाराष्ट्र: पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर
- विदर्भ: वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर
- मराठवाडा: जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली
उद्याही (१९ मार्च) धोका कायम
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्या, गुरुवारी १९ मार्च रोजीही राज्यात अशीच परिस्थिती राहणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात उद्याही ५० ते ६० किमी वेगाचे वारे आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट कायम आहे. जळगाव, नाशिक, जालना, परभणी, बीड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथेही उद्या ऑरेंज अलर्ट असेल. मात्र २० मार्चपासून राज्यात हवामान निवळण्याचा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे संकट अजूनही टळलेले नाही. आज राज्यातील २४ जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील भागांचा समावेश आहे:
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
- विदर्भ: नागपूर, गोंदिया, भंडारा
- मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर
- कोकण: रायगड, रत्नागिरी,
- पालघर, मुंबई, ठाणे
ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार
पुढील ४८ तासांत या जिल्ह्यांमध्ये ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी पुन्हा जोरदार गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अवकाळी पावसाचे हे संकट २० मार्चपर्यंत कायम राहणार असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ऐन काढणीच्या हंगामात आलेल्या या अस्मानी संकटामुळे द्राक्ष, टरबूज आणि रब्बी पिके जमीनदोस्त झाली आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
नागरिकांसाठी आवाहन: हवामान खराब असताना शेतात किंवा उघड्यावर काम करणे टाळावे. विजेची उपकरणे बंद ठेवावीत आणि विजा चमकत असताना झाडाचा आश्रय घेऊ नये. गुरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे.
प्रमुख जिल्ह्यांचा हवामान अंदाज (१८ ते १९ मार्च)
गारपिटीचा इशारा (Hailstorm Warning):
१८ मार्च: अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट (Hail) आणि ५०-६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
१९ मार्च: नाशिक, जळगाव आणि यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भ आणि खान्देश
नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत १८ आणि १९ मार्च रोजी ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि कोकण
मुंबई, ठाणे आणि पालघर: १८ व १९ मार्च रोजी या भागात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रायगड आणि रत्नागिरी: १८ मार्च रोजी वादळी वाऱ्यासह (३०-५० किमी प्रतितास) हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
येलो अलर्ट
विदर्भ : नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा
(येथे विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.)
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड
(काही भागात ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाची शक्यता.)
उत्तर महाराष्ट्र: नाशिक,जळगाव,