जामखेड करमाळा मार्गावर दोन मोटारसायकलींचा भीषण अपघात, एक ठार, दोन जखमी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड करमाळा मार्गावर दोन मोटारसायकलींचा भीषण अपघात झाला. समोरासमोर झालेल्या धडकेत एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात जामखेड आयटीआय जवळ मंगळवारी (९ रोजी) रात्री झाला.

Two motorcycles collide on Jamkhed Karmala road, one killed, two injured, jamkhed accident news today

जामखेड शहरापासून जवळच असलेल्या आयटीआय जवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात जामखेड येथील भारत घागरे यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी शारदा घागरे तसेच संजय गुळवे रा.शेळगाव ता परंडा जिल्हा धाराशिव असे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेनंत जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु गंभीर जखमी असलेल्य भारत घागरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या भीषण अपघातात भारत घागरे यांच्या पत्नी शारदा घागरे यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. तसेच दुसर्‍या दुचाकीवरील संजय गुळवे हेही जखमी झाले आहेत.

दरम्यान, जामखेड–आष्टी, जामखेड–कर्जत, जामखेड–नान्नज व जामखेड–खर्डा या चारही प्रमुख मार्गावर मोठमोठ्या खड्डे पडले आहेत. सतत या मार्गावर अपघात होत आहेत. मागील महिनाभरात १५ ते २० अपघाताच्या घटना घडल्या आहेत.यात अनेक जण जखमी झाले, तर काहींना जीव गमवावा लागला आहे. नादुरुस्त रस्त्यांमुळे वारंवार होणाऱ्या रस्ते अपघाताच्या घटना रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याच ठोस उपाययोजना राबवल्या जात नसल्याचे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.