Tahsildar Transfer 2025 : जामखेडचे वादग्रस्त तहसीलदार गणेश माळी यांची बदली, माळी यांची रवानगी थेट गडचिरोली जिल्ह्यात !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सरकारने जामखेडचे वादग्रस्त तहसीलदार गणेश माळी यांची बदली (tahsildar Transfer 2025) केली आहे. त्यांची रवानगी थेट गडचिरोली जिल्ह्यात करण्यात आली आहे. माळी हे वादग्रस्त तहसीलदार म्हणून ओळखले जात. त्यांच्या मनमानी आणि अरेरावी कारभारामुळे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेत प्रचंड संताप होता. (jamkhed tahsildar)

Tahsildar Transfer 2025, Controversial Tahsildar Ganesh Mali of Jamkhed transferred, Mali sent directly to Gadchiroli district,

तहसीलदार गणेश माळी यांना गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात धाडण्यात आले आहे. माळी यांच्या बदलीचे वृत्त धडकताच जामखेड तालुक्यातील जनतेने आनंदोत्सव साजरा केला आहे. माळी यांच्या बदलीचे आदेश महसुल व वन विभागाने २९ जूलै रोजी जारी केले आहेत. (tahsildar jamkhed)

Tahsildar Transfer 2025, Controversial Tahsildar Ganesh Mali of Jamkhed transferred, Mali sent directly to Gadchiroli district,