जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ऐन कडाक्याच्या थंडीत जामखेड नगरपरिषद निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला असून, शहरातील प्रभाग ११ मध्ये सागरभाऊ टकले यांचेच नाव सर्वाधिक चर्चेत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रभागातील प्रत्येक वाडी, गल्ली आणि घराघरात केवळ सागरभाऊंच्या कार्यशैलीची, त्यांच्या साधेपणाची आणि लोकभावनेशी जोडलेल्या नेतृत्वाचीच चर्चा सुरू आहे. सागरभाऊ टकले हे “जनतेचे उमेदवार” ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. भाजपकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून, प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्या अधिकृत घोषणेची उत्सुकता आहे.
प्रभाग ११ मधील नागरिकांच्या अडचणी समजून घेणे, त्या सोडवण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेणे आणि कोणत्याही वेळी उपलब्ध राहणे ही सागरभाऊ टकले यांची काम करण्याची ओळख बनली आहे. “काम करणारा माणूस हवा, आणि सागरभाऊ हेच त्या कामाचे खरे सेवक आहेत,” अशा शब्दांत नागरिक त्यांच्या कामाचे कौतुक करताना दिसतात.
त्यामुळेच तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच घटकांतून त्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसतो. याची प्रचिती भाजपकडून घेण्यात आलेल्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान स्पष्ट झाली. सागरभाऊ टकले यांच्या रॅलीत उसळलेल्या जनसागराने त्यांच्या पाठिंब्याची भव्य झलक दाखवून दिली.
सध्या प्रभाग ११ मधील जनतेचा कल पाहता “प्रभागाचा खरा सेवक” ही ओळख सागरभाऊंच्या नावाशी अधिक घट्ट होत आहे. तडफदार, कार्यक्षम आणि युवकांमध्ये प्रभावी संघटन असलेल्या सागरभाऊ टकले यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास शहरातील अनेक प्रभागात पक्षाला मोठा फायदा होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपकडून सागरभाऊ टकले यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा कधी होते, याकडे प्रभागातील नागरिकांसह संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.