धक्कादायक : १५ वर्षीय मुलीने संपवली जीवनयात्रा, जामखेड शहरातील घटनेने उडाली मोठी खळबळ

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजीनगर भागात राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. कोवळ्या वयात अत्यंत टोकाचे पाऊल उचलत, मुलीने आपली जीवनयात्रा संपवल्याने, जामखेड शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.

Shocking, 15-year-old student ends her life, incident in Jamkhed city creates huge stir, jamkhed latest news today live,

मयत मुलीचे चुलते मोहन विनायक गायकवाड (वय ३६) रा. मोहा ता जामखेड यांनी जामखेड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यात म्हटले आहे की, जामखेड शहरातील शिवाजीनगर भागात राहणारा माझा मोठा भाऊ गणेश विनायक गायकवाड यांची १५ वर्षीय कन्या भक्ती हीने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना आज ५ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली.

वरील घटनेची माहिती माझे नातेवाईक तुकाराम भोरे यांनी मला फोन करुन दिली. त्यानुसार मी जामखेड ग्रामिण रुग्णालय गेलो होतो, तेव्हा तेथील डॉक्टर यांनी पुतणी भक्ती गणेश गायकवाड वय-15 वर्षे रा. शिवाजीनगर जामखेड हीस तपासुन ती मयत असल्याचे मला सांगितले,अशी खबर जामखेड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

मयत मुलीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही, पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत. सदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.