Samrudhi mahamarg : समृध्दी महामार्गावरील शिर्डी टोल नाक्यावर टायर तपासणी केंद्र सुरू

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (Transport Department and Maharashtra State Road Development Corporation) यांनी सिएट लिमिटेड (SEAT tyre) या टायर उत्पादक कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांच्या टायर तपासणीचा उपक्रम समृध्दी महामार्गावर हाती घेतला आहे. हिंदू ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर ( samrudhi mahamarg) शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने शिर्डी इंटरजेंचवरील टोलनाक्यावर टायर तपासणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. याचे उद्घाटन राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवर ( Transport Commissioner Vivek Bhimanwar) यांच्या हस्ते आज झाले.

Samrudhi mahamarg, Commencement of tire inspection center at Shirdi toll booth on Samrudhi highway, Transport Department Maharashtra State Road Development Corporation SEAT tyre, maharashtra Transport Commissioner Vivek Bhimanwar

परिवहन विभागाने रस्ता सुरक्षेसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे राज्यातील महामार्गावरील अपघाती मृत्युमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षाच्या पाच महिन्यातच ७५० ने कमी झाले आहे. समृध्दी महामार्गावर १० एप्रि पासून १५ हजार वाहनांच्या टायरची तपासणी करण्यात आली आहे. यातील ७५० वाहनांना खराब टायर अभावी समृध्दीवर प्रवेश नाकारण्यात आला आहे. अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवर यांनी दिली.

यावेळी रस्ता सुरक्षा कक्षाचे उप परिवहन आयुक्त भरत कळसकर, श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार,औरंगाबादचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, सहाय्यक परिवहन अधिकारी मनिष दौंड, सिएट लिमिटेडचे सुनिल झा, श्रीनिवास पत्की, अलियान वाझ, सुमेद्य वैद्य आदी यावेळी उपस्थित होते.

भिमनवर म्हणाले, वेग मर्यादचे उल्लंघन, फार काळ विश्रांती न घेता गाडी चालवली तर रस्ता संमोहन होऊन अपघात व वाहन सुस्थितीत नसणे या तीन कारणामुळे समृध्दी महामार्गावर अपघात होत आहेत. वेग मर्यादेचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांचे समुपदेशन करण्यासाठी परिवहन विभागाने समृध्दी महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. आतापर्यंत तीन हजाराहून अधिक वाहनधारकांचे समुपदेशन करण्यात आले आहे.

या टायर तपासणी केंद्रावर सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत वाहनधारकांना नायट्रोजन भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, वॉल्व तपासणी, वॉल्व पिन चेक व रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर दुरूस्ती, टायर वेअर चेक यंत्राचे वितरण या सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. या सुविधेचा जास्तीत वाहनधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अहमदनगर उप प्रादेशिक परिवन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.